साहित्य संमेलनात माहिती व जनसंपर्क महासंचानालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या दालनाला अनेक मान्यवरांनी दिली भेट; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
लातूर,दि.22 : शासनाचे कान, नाक आणि डोळे म्हणून ज्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाची ओळख आहे, त्या विभागाच्या प्रकाशनाचे दालन 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उभे करण्यात आले.
या उभारण्यात आलेल्या दालनाचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सचिवालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्यमंत्री संजय बनसोडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, यासोबतच चला हवा येवू द्या या कार्यक्रमाचे पत्रलेखक आणि साहित्यिक यासोबतच विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
या स्टॉलवर लोकराज्यचे विविध अंक, आपला आदर्श, आपली प्रेरणा महामानव हे पुस्तक अभ्यासक, संशोधक आणि सामान्य वाचक या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे श्रेष्ठत्व आणि त्यांचे चौफेर व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणारे आहेत. माहिती व जनसंपर्क महांसंचालनालय निर्मित ‘महामानव’ हे पुस्तक सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहेत, अशी अपेक्षा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केली. यासोबत महाराष्ट्र आणि महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तिका उपयुक्त अशी आहे. या संमेलनातील या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 95 व्या साहित्य संमेलनामध्ये दि.22 ते 24 या कालावधीत हे प्रकाशन दालन सुरु राहणार आहे. अधिकाधिक लोकांनी या दालनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377