पाचोरा येथे संभाजी ब्रिगेड व शिवसेनेच्या वतीने संभाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण

पाचोरा, दि.28– शिवसेनाप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास दर्शवत मा.मनोज आखरे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांनी युती केलेली आहे.या युतीमुळे संभाजी ब्रिगेडचे राजकारणातील एन्ट्री झालेले असून भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड व शिवसेना अशा युतीच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात उभयांतांनी सामोरे जाण्याचे ठरवले आहे. युती झाल्यामुळे शिवसेनेला फुटिरामुळे जो मतांचा फटका बसलेला होता तो आता भरून निघणार आहे असे अंदाज वर्तविले जात आहे कदाचित हे सत्यही असू शकते,परंतु हा येणारा काळच ठरवेल एकंदरीत सबंध महाराष्ट्रात या युतीमुळे संभाजी ब्रिगेड व शिवसेना यात एक नवीन चैतन्य निर्माण झालेले पहावयास मिळते.
सध्याची राजकीय परिस्थिती बघता जनता ही आता गोंधळात पडलेली दिसते ज्याला जसे वाटते तो त्याच्या परिस्थितीनीरूप पक्ष बदलून घेत असतो नेमके तो काय बघतो आर्थिक हित की जनतेचे कल्याण हे आता त्या त्या मतदारसंघातील जनताच ठरू शकते.संभाजी ब्रिगेडचे सबंध महाराष्ट्र गाव खेड्यापासून ते शहरांपर्यंत फार मोठ्या प्रमाणात संघटन आहे. याच संघटनाचा फायदा या युतीला होऊ शकतो.
संभाजी ब्रिगेड मार्फत अनेक लोकोपयोगी कामे व समाजसेवेचे उपक्रम राबविले जात होते परंतु राजकीय ताकद ही त्यांच्याकडे नसल्यामुळे अनेक गोष्टींना मर्यादा येत होत्या. शिवाय अनेक राजकीय पक्ष व त्यातील मंडळी ही त्यांच्या स्वार्थासाठी अनेक निर्णय समाजाभिमुख न घेता विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन घेत होते. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा सामाजिक ,आर्थिक, राजकीय प्रगती व्हावे जेणेकरून समाजापुढे उभे असलेले सर्व प्रश्न मार्गी लागावे यासाठी राजकारणात येऊन आपले प्रतिनिधी विधिमंडळावर पाठवावे असे अनेक वर्षांची ईच्छा आता संभाजी ब्रिगेडची या राजकीय युतीमुळे पूर्ण होण्याचे दिसत आहे.
पाचोरा येथील राजे संभाजी चौकामध्ये संभाजी ब्रिगेड व शिवसेना पदाधिकारी यांच्यावतीने संभाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले यावेळी शिवसेना माजी आमदार स्व.आर ओ पाटील यांच्या कन्या सौ.वैशालीताई सूर्यवंशी,गणेश परदेशी, उध्दव मराठे,दत्ता जडे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील,राजेंद्र भोसले ,राजू पाटील, मुकेश तुपे यांच्यासह अनेक शिवसेनेचे व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेच्या व संभाजी ब्रिगेडच्या समर्थनार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली व पुढील निवडणुकीत एकनिष्ठ राहून युतीच्या विजयाची निश्चितता प्रकट करण्यात आली.
सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष म.मनोज आखरे व माननीय उद्धवजी ठाकरे यांचे विचार हे मिळते जुळते असून या युतीमुळे लोकशाहीची मूल्ये जपणे व संविधान टिकवणे , जनसेवा करणे हा एक उदात्त हेतू या दोघांनी डोळ्यासमोर ठेवून ही युती केलेली आहे व भविष्यात आम्ही या युतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेऊन जनसेवेचा वारसा पुढे जोपासणार आहोत.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



