क्रिडा स्पर्धेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आवेदन पत्र सादर करण्याचे आवाहन
जळगाव दि. 3- केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा नियंत्रक मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळया राज्य शासनाच्या वतीने त्या त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धासाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेवून र्स्प्धासाठी पाठविले जातात. राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धासाठी महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविलेली आहे. त्यामुळे आपल्या विभागात / कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या कार्यालय/ विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू / नियमित कर्मचाऱ्यांच्या सदर बाब निदर्शनास आणून टेबल टेनिस, बॅडमिन्टन, फुटबॉल, हॉकी, क्रीकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रिज, कॅरम, बंध्दिबळ ॲथलेटिक्स, लधु नाटय, कबड्डी, वेटलिफटींग, पावर लिफटीग, शरीरसौष्टव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगित इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धातून ज्या खेळाडू / कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र हे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव यांच्याकडून आवेदन पत्र सादर करण्यासाठी असलेल्या विहित मुदतीत प्राप्त करुन घेवून प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे भरुन ते कार्यालय प्रमुख यांच्या मान्यतेने एक आगाऊ प्रतिसह मा. व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, 6, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032 यांच्याकडे दिनांक 30 जुलै, 2022 पर्यंत टपालाव्दारे / व्यक्तीश: तसेच sachivalayagym@rediffirmail.com या ईमेलव्दारे पाठवावीत असे आवाहन सचिवालय जिमखाना, मुंबई यांच्यामार्फत करण्यात येत आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377