ताज्या बातम्या
5 जून रोजी भरणारे आठवडे बाजार इतर सोईच्या दिवशी भरवावे – जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत
जळगाव दि.3-जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 100 ग्रामपंचायतीतील 114 रिक्त सदस्य पदाच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचेकडून पारंपारिक पध्दतीने प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पोटनिवडणूकीसाठीची नामनिर्देशन व माघारीची प्रक्रीया पुर्ण झालेनंतर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 8 ग्रामपंचयातीमधील रिक्त सदस्य पदासाठी दिनांक 5 जून, 2022 रोजी मतदान होणार असल्यामुळे सदर दिवशी कायदा व सुव्य्वस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून भसावळ तालुक्यातील साकरी, चाळीसगाव तालुक्यातील जामडी प्र ब, जामनेर तालुक्यातील वडगांव बु. मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा, पाचोरा तालुक्यातील खेडगाव, यावल तालुक्यातील डांभुर्णी, राजोरे, हिंगोणा या दिवशी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावेत, असेही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377