सौ.सा.प.शिंदे प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
पाचोरा ता.15 – येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित सौ.सा.प. शिंदे प्राथमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न प्रवेशोत्सव प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.निरज भाऊ जैन, सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. राहुल पाटील. पालकांचे प्रतिनिधी म्हणून श्री. तुषार येवले, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पहिल्याच दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी डॉ राहुल पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना आरोग्या विषयी माहिती दिली. व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. निरज जैन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कोरोना काळातील दोन वर्षाचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने भरून काढण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री शिवाजी शिंदे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मान्यवर व उपस्थित पालक बंधू भगिनींच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वितरण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.सु.ना.पाटील सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले व विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सरोज बावा यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती सुवर्णा महाजन यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक बंधू भगिनी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377