पाचोरा,दि ५ – म.सचिव सो. महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांचेकडील परिपत्रक महाराष्ट्र प्लॅस्टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्तूंचे (उत्पादन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचनेनूसार प्लॅस्टीक कॅरी बॅग, नॉन ओव्हन पिशव्या, वापरास बंदी घातलेली आहे. त्यानूसार पाचोरा नगरपरिषदेने दिनांक “प्लॅस्टीक मुक्त पाचोरा शहर अभियानाअंतर्गत” आज दि 05 जुलै रोजी पाचोरा शहरातील विविध प्लॅस्टीक पिशव्या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर धडक मोहिम राबविण्यात आली नगरपरिषदेकडून शहरातील आस्थापना,दुकाने, फेरीवाले, हॉटेल्समध्ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टीक पिशव्या जप्त करण्याची धडक मोहिम राबवून सुमारे 40 किलो प्लास्टिक जप्त करून रक्कम रुपये 50,000/- मात्र दंड वसूल करण्यात आला तसेच यापुढे देखील मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्हा पुन्हा बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्द यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. नागरीकांनी देखील प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर पुर्णपणे बंद करुन घरुनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे शहरातील सामाजीक संस्थांशी संपर्क करुन प्लॅस्टीक बंदी मोहीमेत उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा तसेच प्लॅस्टीक वापराबाबत काही शंका असल्यास व्यापारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्याचे देखील आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर यांनी केले.
सदरची मोहिमेकरिता विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात खालील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लीडिंग फायरमन राजेश कंडारे , प्रकाश लहासे,नरेश आदिवाल ,विनोद सोनवणे,भिकन गायकवाड,सतीष जगताप,आकाश खैरनार,विजय ब्राह्मणे,अमोल अहिरे,बाप्पू ब्राह्मणे,सुखदेव ठाकूर,अर्जुन सूर्यवंशी.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377