विठ्ठल बाप,विठ्ठल माय, विठ्ठल माझा दुधावरची साय
पाचोरा — पाचोरा सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे “आनंदवारी” ‘दिंडी सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी,संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव अशा विविध वेशभूषा करून कळस,तुळशी,टाळ-मृदुंगाच्या विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी- रिंगण सोहळा स्वतः अनुभवत आनंद घेतला.
पाचोरा नपाच्या मा.नगरसेविका सौ.सुचेताताई वाघ,तनिष्का गटाच्या अध्यक्षा नानीसो.ज्योतीताई वाघ व सौ. ऐश्वर्या ताई वाघ,सौ.ऐश्वर्या,सौ. वृषाली ताई वाघ यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीचे औक्षण करण्यात आले.तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा मा.आमदार भाउसो दिलीप वाघ,चेअरमन नानासो. संजय वाघ,पालक प्रतिनिधी श्री.दीपक शेवरे व श्री.समाधान पाटील यांच्यातर्फे सर्व बाल वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377