लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि. 01 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या अर्धपुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उपसचिव विलास आठवले, राजेश तारवी, विधानसभा अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



