जिल्ह्यातील नोंदीत दुकाने,आस्थापनानी राष्ट्रीय ध्वज लावण्याचे आवाहन

सोलापूर, दि.05 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम १३ ऑगस्ट ते 15 ऑगस्टअखेर व्यापक प्रमाणात राबविण्याबाबत शासनाचे निदेश आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व नोंदीत दुकाने व आस्थापना यांनी राष्ट्रीय ध्वज आस्थापनेच्या ठिकाणी लावावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने केले आहे.
हा उपक्रम राबवताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे व जाणते अजाणतेपणे राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी जाणीवजागृती निर्माण करुन घेण्याची विशेष काळजी घावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



