महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारच्या विरोधात पाचोऱ्यात आंदोलन….
पाचोरा,दि 6 -दिवसेंदिवस वाढत चालल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत पाचोरा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
देशातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर कॉंग्रेसच्या देशव्यापी आंदोलन केले जात आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी देशात हुकूमशाही सुरु झाली आहे. बेरोजगारी महागाईच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांना ईडीची भिती दाखवून त्यांना गप्प केले जात असल्याचा आरोप केला.
केंद्र सरकारने आणलेली अग्निपथ योजना, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी,गॅस, दरवाढ आदी घोषणाबाजी केली.सदर च्या घोषणांनानी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयात पर्यंतचा परीसर दणदणला होता.
काँग्रेसच्या वतीने आंदोलन रुपी निषेध व्यक्त करून तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी इडी च्या नावाखाली विरोधी पक्षनेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू असून खा. मल्लिका अर्जुन खरगे यांना नोटीस दिली या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, शेख इस्माईल शेख फकिरा , प्रताप पाटील, इरफान मणियार, प्रदीप चौधरी, शंकर सोनवणे, रामदास गायकवाड,अल्ताफ शेख, राहुल शिंदे, कल्पेश येवले, रवींद्र भावसार, शरीफ शेख, नवाब खाटीक, , संगीता नेवे, कुसुम पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद खान, सै. इकबाल सै मेहबुब, भाऊसाहेब कुंभार, आर. जी. अहीरे,नुरकलाल बागवान, बिस्मिल्ला टकारी, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377