अमळनेर बस दुर्घटनेत पितृ छत्र हरपलेल्या-कु.कोमल चौधरीची अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)उचलली शैक्षणिक जबाबदारी.

अमळनेर- अलीकडेच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत,बस अपघातात एकूण अंदाजे 13 प्रवासी मृत्युमुखी पडले होते,त्यात अमळनेर तालुक्यातील 5 लोकांचा समावेश होता.अमळनेर आगारात वाहक असलेले प्रकाश चौधरी सदरीलदुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडले होते.प्रकाश चौधरी यांची कन्या कु.कोमल चौधरी या विद्यार्थिनीची अमळनेर कोचिंग क्लासेस संघटनेने इ.11वी व 12वी ची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी उचललेली आहे, मा.सीमा अहिरे मॅडमउपविभागीय अधिकारी वउपविभागीय दंडाधिकारीअमळनेर भाग,अमळनेर.यांच्या कार्यालयात क्लासेस संघटना अध्यक्ष श्री.भैय्यासाहेब मगर सरयांनी तशी अधिकृत घोषणा केली.यावेळी मा.सीमा अहिरे मॅडम यांच्याहस्ते कु.कोमल चौधरीला शैक्षणिकसाहित्य देण्यात आले.यावेळीकोमलचे पालक(काका)श्री.निलेश चौधरीतसेच क्लासेस संघटना(PTA)अध्यक्ष-श्री.भैय्यासाहेब मगर, श्री फिजिक्स क्लासेसचे-श्री.महेश बढे सर,सुमन अकाँटन्सी व केमिस्ट्री क्लासेसचे-श्री.चंदुलाल बडगुजर सर,योगीराज Maths क्लासेसचे- श्री.शिरीष डहाळे सर,अर्जुन बायोलॉजी क्लासेसच्या-सौ.सोनल जोशी मॅडम तसेच एस.टि.महामंडळाचे कर्मचारी-श्री.मनोज पाटील उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत



