जिल्ह्याच्या शैक्षणिक पायाभरणीत श्रीमंत बाळासाहेबांचे योगदान :सुवर्णसिंग राजपूत
पाचोरा,दि १८ – “नगरदेवळा येथील जहागीरदार श्रीमंत सरदार बाळासाहेब कृष्णराव शिवराव पवार हे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. राजेशाही परिवारात जन्माला आल्यामुळे त्यांच्या मधील अंगभूत नेतृत्व आणि दातृत्व उल्लेखनीय होते. जळगाव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी सतत 13 वर्ष कार्यरत असलेल्या बाळासाहेबांनी जिल्हापरिषदेचे आर्थिक, नियोजन, वित्त, बांधकाम व शिक्षण सभापती पदही समर्थपणे सांभाळले. जिल्ह्यातील ग्रामीण विकासात विशेषतः जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या पायाभरणीत श्रीमंत बाळासाहेबांचे भरीव योगदान आहे “- असे प्रतिपादन मिठाबाई कन्या शाळेचे पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत यांनी पाचोरा येथे केले. बाळासाहेब के. एस. पवार यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयात बाळासाहेब पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. पर्यवेक्षक सुवर्ण ₹सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला प्राचार्य संजय पवार , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, माणिकराजे माणिक राजे ट्रस्टचे विश्वस्त प्रा. रवींद्र चव्हाण, प्रा. शिवाजी शिंदे, जयदीप पाटील, आर. के. माळी, सुभाष जाधव, पी जी चौधरी, वरिष्ठ लिपिक शिवाजीराव बागूल, आर. ओ. पाटील, प्रा, प्रतिभा परदेशी, कुंदा पाटील- शिंदे, प्रा. अंकिता शेळके- देशमुख, प्रतिभा पाटील, सुरेखा बडे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित शिक्षक व शिक्षिका यांनी बाळासाहेब के. एस. पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प पाकळ्या अर्पण करुन आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. शिवाजी शिंदे यांनी बाळासाहेब के. एस. पवार यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व राजघराण्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
आर. ओ. पाटील व जयदीप पाटील या शिक्षकांनी बाळासाहेबांच्या सहवासातील प्रेरणादायी आठवणी सांगितल्या. ज्येष्ठ शिक्षिका प्रा. प्रतिभा परदेशी यांनी नगरदेवळ्याचे पवार घराणे व सामाजिक- धार्मिक ऐक्य या विषयावर विचार व्यक्त केले. प्राचार्य संजय पवार यांनी आपल्या मनोगतात बाळासाहेबांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था व मुलींचे शिक्षण या विषयावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात ‘श्रीमंत सरदार बाळासाहेब पवार यांच्या दातृत्व विषयीची माहिती सांगताना विविध दाखले दिले. सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात श्री राजपूत यांनी बाळासाहेब पवार यांनी उभारलेले देवालये, व त्यांच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी दिलेल्या शेतजमिनी, शेती मशागत करणार्या प्रत्येक कुळास परत केलेल्या त्यांच्या जमिनी, तसेच मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी उभारलेल्या कन्याशाळा आणि राजघराण्यात जन्माला येऊन सुद्धा बाबासाहेबांच्या मनात सर्वसामान्य बद्दल असलेली कणव, सहानुभूती, परोपकाराची भावना याबद्दल विविध उदाहरणे व दाखले दिलेत. बाळासाहेबांच्या सहवासातील प्रेरणादायी प्रसंगाचे वर्णनही त्यांनी हुभेहुभ केले.
उज्वला महाजन- देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कलाशिक्षक निवृत्ती बाविस्कर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377