आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
राजकीय

पाचो-यात अदित्य ठाकरेंच्या सभेला जनसागर उसळला

पाचोरा – जळगाव जिल्ह्यातील शिवसंवाद दौऱ्या निमित्त माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या सभेना सर्वत्र अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला एवढेच नाहीतर अनेकांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला. महाविकास आघाडीचे सरकार कोसळून नवीन भाजपा व शिंदे गट असे सरकार स्थापन झाले आहे. शिंदे गटात 40 आमदार सहभागी झाले ते मूळ सेनेचे होते परंतु या सर्व आमदारांना मंत्री पदाचे अमिष दाखवून किंवा काही आर्थिक प्रलोभने दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला गेला व तो सक्सेसही झाला चाळीस आमदारांसह दहा अपक्ष असे 50 आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडले किंवा हिंदुत्वाचा मुद्दा हाच पुढे करून हे सर्व आमदार फुटले. सर्वात जास्त निधी हा शिवसेनेला न मिळता इतर पक्षांना दिला जात होता अशी ओरडही बऱ्याच आमदारांनी केली सेनेच्या आमदारांना विकास निधी मिळत नाही हे सर्व आमदार बोलू लागले याच मुद्द्यांवर त्यांनी शिवसेना पक्ष सोडून शिंदे गटात सामील झाले व सरकार स्थापन केले परंतु यानंतर जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये जे सेनेतील मागील सरकारमध्ये मंत्री होते त्याच मंत्र्यांना संधी देण्यात आली परंतु त्यांना महत्त्वाचे खाते मात्र मिळाले नाही यामुळे आता शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे किंबहुना अनेक आमदारांना यावेळेस मंत्रीपद मिळू न शकल्याने तेही आता नाराजीचा सुरू आवळत आहे किंबहुना जे नाराज आहेत ते पुन्हा मातोश्रीवर जाण्याच्या तयारीतही असू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच या शिव संवाद यात्रेमध्ये आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून हे सरकार जास्त काळ टिकणार नसून ते पडणार याची शाश्वती ते जणू उपस्थित सर्व नागरिकांना , शिवसैनिकांना देत होते

आमदार हे हिंदुत्वासाठी किंवा कमी निधी मिळाला म्हणून बाहेर पडले नसून यातील एक राक्षसी वृत्तीचे व्यक्तीच्या सांगण्यावरून किंबहुना त्याला अपेक्षित असलेल्या अती महत्त्वाच्या पदलालसेने गद्दारी केलेली दिसते तसेच आपणच मूळ शिवसेना पक्ष आहोत असे जनतेला व मतदारांना हे फुटीर आमदार भासवताना दिसत आहे यांच्यामध्ये एवढीच हिम्मत असेल तर या 40 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा व तात्काळ इलेक्शन लावावे यांना जनता काय आहे ते कळेल व शिवसैनिक काय करू शकता हे त्यांना दिसून जाईल. सेना पक्ष संपवण्यासाठी एक राष्ट्रीय पक्ष कार्यरत असून उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला जात आहे

माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकास कामे झाली जनतेची, कामे झाले शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, गड किल्ले दुरुस्तीसाठी सहाशे कोटी निधी ,कोरोना काळात जनतेचा प्राण वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. आमदारां विषयी सांगताना ते म्हटले की जे मंत्रीपदाच्या लालसेने गेले किंबहुना पचास खोके एकदम ओके अशा बेरजेच्या राजकारणांनी जरी ते फुटून बाहेर निघाले तरी त्यांच्या हातात काय मिळाले तर बाबाजी का ठल्लू असे सांगताच जनतेमधून हास्यकल्लोळ झाला .

यावेळी सभेला अभूतपूर्व गर्दी झालेली बघावयास मिळाली ही गर्दी पाहून कदाचित विरोधकांमध्ये चलबिचल नक्कीच सुरू झाले असेल या सभेला स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी व शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला तसेच अनेक जुने निष्ठावंत सैनिक यावेळी मंचावर उपस्थित दिसले. ठाकरेंनी आपल्या भाषणात त्यांनी सरकार जाण्याचे दुःख नसून पुन्हा आपल्या शिवसैनिकांचा जोरावर सरकार आणणार हे विश्वासाने सांगितले तसेच उपस्थित शिवसैनिकांन कडून आपण आम्हाला सात देशाल हे वचनही मागून घेतले. वैशाली ताई यांना तिकीट द्यावे किंवा नद्यावे हा माझा अधिकार नसून तो पक्षप्रमुखांचा अधिकार आहे परंतु आजच्या या उपस्थित जनसमुदायामुळे मला एक खात्री नक्की आहे की मला येथे पुन्हा प्रचारासाठी पूर्ण एक दिवस यावे लागणार हे आता जाणवले आहे. बंडखोर आमदारांच्या गुवाहाटी दौ ऱ्यासंदर्भात त्यांनी टीकास्त्र सोडताना सांगितले की जर हे खरे शिवसैनिक असते तर त्यांनी तिथे हॉटेलमध्ये मोजमस्ती न करता पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी धावले असते.

माननीय आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी महाराणा प्रताप चौकात भला मोठा हार तयार करण्यात आला होता परंतु त्यांनी तो न स्वीकारता महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी व शहीद जवानांच्या स्मरणार्थ खेद व्यक्त करून अशा प्रकारचे जंगी स्वागत स्वीकारणे टाळले
सदर कार्यक्रमा वेळी वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिवंगत स्व. तात्यासाहेब आर ओ पाटील यांचा एकनिष्ठ व सेवाभावी वृत्तीचा वारसा पुढे नेणार असल्याचे सांगितले उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू व भगिनींकडून आपल्याला मला साथ द्यायची आहे ही भावना व्यक्त करून दाखवली व आपल्यासाठी मी सेवाभाव वृत्तीने कार्यरत राहील अशी ग्वाही दिली .
सभा सुरू होण्यापूर्वी अनेक निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली अरुण पाटील, रमेश बाफना सर,एडवोकेट अभय पाटील आपल्या भाषणातून फुटीर आमदारांचा चांगला समाचार घेतला.माजी जिल्हा शिवसेनाप्रमुख गणेश परदेशी,मुंबई महानगरपालिकेच्या
नगरसेविका अंजली नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख सुनील
पाटील या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ.किशोर पाटील यांच्यावर टीका केली

व्यासपीठावर नरेंद्र सूर्यवंशी,माजी जि प सदस्य उद्धव मराठे, तालुका प्रमुख शरद पाटील,नगरसेवक दत्ता जडे, दादाभाऊ चौधरी, भरत खंडेलवाल, खंडू सोनवणे, अजय सावंत,डॉ. एस. टी. पाटील, मनोहर चौधरी, आबा कासार, पप्पू जाधव, आदी पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभे दरम्यान अनेकांचे पॉकेट व पैसे चोरीला गेल्याचे कळले तसेच आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी व सोबत सेल्फी घेण्यासाठी तरूणाई प्रचंड उत्साही होती शिवाय अलोट गर्दी
उसळल्याने पोलीस यंत्रणेची व बॉडीगार्ड यांची ही दमछाक होताना दिसली . पत्रकारांसाठी जे स्टेज तयार केले होते ते कोसळते की काय अशी भीती सर्व उपस्थित मंचावरील पत्रकारांना वाटत होते.

मा.आदित्य ठाकरे यांची ही संवाद यात्रा आणि या निमित्ताने एकनिष्ठ शिवसैनिक जे एकत्र आले व भविष्यातही पुढील काळातील निवडणुकांना सामोरे जाणार असल्याने आज मीतिला विरोधकांमध्ये नक्कीच या यशस्वी वातावरणामुळे चलबीचल अवस्था निर्माण झाली असेल. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नवीन समीकरण पुढील काळात बघावयास मिळणार काय हा उत्सुकतेचा विषय ठरलाय

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!