आ.किशोर पाटलांची कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मा.आ.दिलीप वाघ यांना साद

पाचोरा, दि.२:- दि.1ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची 2021- 22 ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळेस प्रमुख उपस्थिती आ.किशोर पाटील यांची होती सभेला शेतकरी, व्यापारी अडतदार ,कामगार,वि.का. सोसायटी सभासद, चेअरमन, ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य मंडळ ,कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी आदी उपस्थित होते .

या सभेवेळी प्रास्ताविक बी बी बोरुडे यांनी मांडले कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांचा प्रगतिशील लेखाजोखा त्यांनी सादर केला . सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थीत प्रशासक मंडळ, अतिथी, आमंत्रित शेतकरी, व्यापारी ,कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी ,कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणारे यांचे सत्कार करण्यात आले.कोरोना काळा नंतर झालेल्या या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेनंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रशासक मंडळ यांच्या कार्याचे कौतुक केले .सहकार क्षेत्रात राजकारण न करता पक्ष भेदभाव दूर सारून तालुक्यातील शेतकरी , व्यापारी, कामगार आदींचा कसा विकास होऊ शकतो हे बघणे गरजेचे आहे, शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी मा.आ.दिलीप वाघ यांना सहकार्यचे आवाहन करीत पुढील सहकार क्षेत्रातील निवडणुका एकत्रित लढून आपले खंदे शिलेदार कृषी उत्पन्न बाजार समितीवर पाठवून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जाऊ शकतात व बाजार समितीचा विकास होऊ शकतो हे स्पष्ट केले. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर सोबत असल्याचे सांगत आता शिंदे गट शिवसेना व भाजपा एकत्र आल्याने जरी आपण वेगवेगळ्या विरोधी पक्षात कार्यरत असलो तरी सहकार क्षेत्रात एकत्र येऊन विकासात्मक दृष्टिकोन ठेवून निवडणुका लढविल्या पाहिजे असे बोलून दाखवले.
तर यास आपल्या भाषणात दिलीप वाघ यांनी प्रतिसाद देत सहकार क्षेत्रातील पक्ष विरहित आघाडी केल्यास नक्कीच शेतकरी हीत जोपासले जाईल असे सांगत पुढील काळात बाजार समिती मार्फत कृषी प्रदर्शन भरवणे, आधुनिक पद्धतीने भाजीपाला विक्री मार्केट बनवणे, शेतकरी विमा पॉलिसी काढणे अशा अनेक नावीन्यपूर्ण उपाय योजना केल्या जाऊ शकतात व प्रगतीचा आलेख वाढला जाईल असे व्यक्त केले. परंतु राजकीय पक्ष वेगळे असल्याने जे काही पक्ष आदेश असतात ते सर्वांनाच लागू असतात ईतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षादेशा प्रमाणे लढविल्या जात असतात परंतु यात सहकार क्षेत्र अपवाद असल्याचा दुजोरा देत सहकार क्षेत्रातील निवडणुका एकत्र लढविण्याची शक्यता बोलून दाखवीली व आ किशोर पाटील यांनी प्रशासकीय मंडळात काही निरुपयोगी माणसं टाकल्याची खंत बोलून दाखवली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासक चंद्रकांत धनवडे, रणजित पाटील ,अनिल महाजन तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व कर्मचारी वर्ग ,हमाल मापाडी कामगार संघटना, व्यापारी असोसिएशन आदींनी मोलाचे सहकार्य केले.तर सचिव बोरुडे यांनी सभेचे उत्कृष्ट नियोजन केल्याचे सर्व स्तरातून बोलून दाखविले.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



