आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
राजकीय
Trending

पाचोरा तहसिलदार यांना
शिवसेना शिंदे गटाचे- बकाले अटकेसाठी निवेदन

पाचोरा,दि.10 – मराठा समाजाविषयी आक्षेर्पाह व अश्लील संभाषण करणारे एलसीबीचे माजी पोलीस निरक्षक
किरण कुमार बकाले यांची येत्या 3 दिवसात पोलीस दलातुन बडतर्फी व अटक करावी तसे न झाल्यास येत्या गुरुवार पासुन आमरण उपोषणाला बसणार असल्याचे किशोर बारावरकर यांनी इशारा दिला आहे.

मराठा समाजाविषयी आक्षेर्पाह वक्तव्य करणारे एलसीबीचे माजी पोलीस निरक्षक किरणकुमार बकाले यांना निलंबित करून 20 दिवसांवर अधिक काळ उलटला असूनही त्यांची पोलीस दलातुन बडतर्फीची व अटकेची कारवाई झालेली नाही. ही खेदाची बाब होय. शिवाय मराठा समाजत या बद्दल संतप्त भावना उमटत असतांना देखील महाराष्ट्र पोलीस दल हे न्याय देत नसून वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी वेळोवेळी कारवाई च्या आश्वासना नंतरही त्यांना शोधुन अटक करण्यात आलेली नाही एवढेच नव्हे तर न्यायपालिकेने जामीन फेटाळल्यानंतर ते मोकाट फिरत आहेत. याचाच अर्थ त्यांना कुठे तरी राजकीय व पोलीस खाते मार्फत छुपी मदत होत आहे.पोलीस दलातुन बडतर्फीची ठोस कारवाई केले जात नाहीय.किरण कुमार बकालेला पाठीशी घालणाऱ्या व मदत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुद्धा तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. संतप्त मराठा
समाजाचा अंत कोणीही पाहु नये. समाज शांत आहे याचाच अर्थ कदापी असा नाही वातावरण शांत झाले म्हणुन विसरले जाईल. भरपुर वेळ आणि कालावधी दिला गेला आहे. आता कोणतेही आश्वासन नव्हे तर ठोस कारवाई झाली पाहिजे नाहीतर येत्या 3 दिवसात शिवसेना शिंदे गटाकडुन शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर हे आमरण उपोषणास सकाळी 10 वाजेपासुन बसणार आहे. तरी होणारे परीणामास व नुकसानीस पोलीस व महसुल प्रशासन जबाबदार राहिल असा गर्भित इशाराही बारावकर यांनी यावेळी निवेदनातून दिला व नायब तहसीलदार संभाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुनीता ताई पाटील,उद्योजक मुकुंदअण्णा बील्दीकर, सुनील पाटील ,गंगाराम पाटील, सागर पाटील, गजू पाटील, वैभव राजपूत,जितेंद्र पेंढारकर, नितीन चौधरी, राहुल क्षीरसागर जय बारावकर यांच्यासह अनेक मान्यवर व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!