महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत शेगावी मोठया संख्येने सहभागी होणार

पाचोरा,दि.१२- कॉंग्रेस खा.राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मततेसाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील 18 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विराट सभेसाठी पाचोरा – भडगाव तालुक्यातून मोठया संख्येने सहभागी होण्याचा निर्धार महाविकास आघाडीने एकमताने आज दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी शासकीय विश्राम गृह येथील बैठकीत केला .या वेळी पाचोर तालुक्यातून सुमारें 5000 लोक सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
महाविकास आघाडिच्या बैठकीत राष्टवादी काॅग्रेसचे नेते माजी आ. दिलिप वाघ,शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी सह राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजर खान,रणजित पाटील, शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, सरचिटणीस प्रताप पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन ,महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील,मुकेश तुपे, गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, तालुका एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, अजबराव काटे, रवींद्र महाजन, अमरसिंग पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, अतुल चौधरी आदी उपस्थित होते.
यात्रेत राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, काँगेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी,संभाजी ब्रिगेड यांनी मोठया संखेने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
सभेला जवळपास पाचोरा – भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा संकल्प केला असल्याने सुमारें 40 बसेस ची व्यवस्था देखिल करण्यात आली आहे.यावेळी बैठकीस महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी दि १४ नोव्हेंबर पर्यंत संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



