पाचोरा दि.14- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती (बालदिन) साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाळ सत्रात श्री.ईश्वर पाटील सर,दुपार सत्रात श्रीमती.लक्ष्माबाई सोनवणे मॅडम,भडगाव रोड विभागात श्रीमती.जयश्री पाटील मॅडम होत्या. विद्यार्थ्यांच्या हस्ते पंडित नेहरूंच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्रीमती.योगिता ठाकूर मॅडम, श्री.मनोज पवार सर,श्री.दीपक पाटील सर,श्री.राकेश पाटील सर व मा.अध्यक्षांनी आपली मनोगते व्यक्त करत नेहरूंचा जीवनपट उलगडत विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. शाळेतील उपशिक्षिका श्रीमती. रूपाली पाटील मॅडम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवींद्र महाले सर,श्री.महेश लोखंडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती सीमा भदाणे मॅडम व श्री.आशिष पाटील सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.”बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377