
जळगांव दि10- जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘मानवी हक्क दिवस’ साजरा करण्यात आला.मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काचे ज्ञान माहित होणे व त्याबद्दल जागृती होण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो. या वर्षी मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणेचा 75 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अँड प्रविण आर पांडे व केतन सोनार यांनी यावेळी व्याख्यान दिले.
यावेळी जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी मानवी हक्काची पार्श्वभूमी व प्रस्तावना सादर केली. तसेच केतन सोनार यांनी 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन का सादर केला जातो, साधारण नागरीकास कोणकोणते मुलभूत हक्क आहेत व कायद्यामध्ये त्यांची काय तरतुद आहे याबाबतची सविस्तर माहिती दिली.
तसेच अँड प्रविण पांडे यांनी जनसामान्यांच्या मानवी हक्कांबाबत आवश्यक माहिती सांगून मानवी हक्क व मुलभूत अधिकार यातील साम्य उलगडून दाखविले.
या कार्यक्रमास राहूल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी , श्री वांडेकर, अधीक्षक जिल्हा कारगृह, अँड. प्रविण आर पांडे, अॅड सोनार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव, चंद्रकांत वानखेडे, उपआयुक्त म.न.पा जळगाव, . लिलाधर ना. कानडे, पोलीस निरीक्षक शहर वाहतुक जळगाव, बी. बी. ठोंबे, पोलीस निरीक्षक जि. वि. शा.,अँड. जावेद सलीम पटेल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव, सौ सरला विजय पाटील विस्तार अधिकारी प्राथमिक शिक्षण जि.प. जळगाव,मनिषा अनिल बागुल जाणिव बहुउद्देशीय संस्था जळगाव, राजेंद्र पाटील अधीक्षक जिल्हा महिला व बालकल्याण विभाग जळगाव, माध्यम प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे , प्रविण एल. पाटील जाणिव बहुउदेशीय संस्था, मुकेश राजेश कुरील समाज सेवक संविधान साक्षरता अभियान, निलेश जयराम बोरा अध्यक्ष जनसेवा विचारधार फाऊंडेशन, डी. आर. गाडेकर ,आर. बी. कर्डक ,राहुल वाघ, दिनकर मराठे,जगदिश ढमाले ,प्रेमराज वाघ इ. उपस्थित होते.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



