एरंडोल – कासोदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरिक्षक नीता कायटे यांची सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कोरोना काळात नोडल अधिकारी म्हणून त्यांचे कार्य पाहिले तर फार उल्लेखनीय राहिले तसेच या महामारीच्या काळात जोखीम पत्करून ते कर्तव्य बजावीत होत्या.त्यात त्या कोरोना पॉझिटिव्ह देखील आल्या परंतु वैद्यकीय उपचारांती कोरोनावर मात करीत त्या पुन्हा सेवा बजावण्यास हजर झाल्या.
विविध गुन्ह्यांचा तपास बुधिकौशल्याने लावत आपली वेगळी छाप निर्माण केली ,सामाजिक कार्यात नेहमीच त्या अग्रेसर असतात, महापुरुषांचे जयंती साजरीकरणे,शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे मदत करणे,गुरुजनांचा सत्कार करणे,तसेच पिडीत महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ त्या महिलांसाठी बनले आहे. बऱ्याच घटस्फोटीत महिलांचे त्यांनी योग्य समुपदेशनातून प्रश्न मार्गी लावले आहेत.एक लेडी सिंघम अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुआ म्हणून कार्य करीत भीती दूर केली आहे. पथनाट्याच्या माध्यमातून दिवाळी सह इतर सणांमध्ये चोऱ्या, व गुन्हे कसे थांबतील यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली.त्यांच्या अशा अनेक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सेवा गौरव पुरस्कार हा संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिन व कु.लक्ष्मी पंडित हिच्या आठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि औरंगाबाद मार्फत दिला जाणार आहे.औरंगाबाद येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व भव्य रक्तदान शिबिर आयोजित असून दिनांक ३०/१२/२०२२ रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.असे पत्राद्वारे नीवड समिती तर्फे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.
.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377