गो से हायस्कुल पाचोरा येथे सायबर सिक्युरिटी कार्यशाळेचे आयोजन संपन्न
पाचोरा,दि.6- श्री गोसे हायस्कूल आणि युनिक कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्तविद्यमाने दि.6 डिसेम्बर रोजी गो से हायस्कुल येथे सायबर सिक्युरिटी कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी MKCL मार्फत श्री संतोष बिरारी सर, सिद्धेश कॉम्प्युटर्स धुळे (RLC) यांनी विद्यार्थीना सायबर सिक्युरिटी बद्दल योग्य ते मार्गदर्शन केले.
श्री.संतोष बिरारी यांनी शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल, व्हाट्सअप, आदी सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक व सामाजिक मानहानी कशी केली जाते याविषयी मार्गदर्शन केले.तर श्री.योगेश गणगे साहेब यांनी शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियाचा काळजीपूर्वक हॅण्डल करावा, गेमिंग वर भर न देता शैक्षणिक प्रगती साधावी असे मत मांडले.
पाचोरा शहरातील नावाजलेले युनिक कॉम्प्युटर्स कोचिंग क्लासेस यांचे वतीने विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नवनवीन शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात आधुनिक काळातील बदल ओळखून त्या अनुशंगाने कोर्सेस शिकविले जातात डीजीटल युगात आता विद्यार्थ्याना सुद्धा टेक्निकल स्किल शिकणे गरजेचे आहे. दिवसं दिवस मानव हा प्रगती करीत आहे आता मानवाची जागा रोबोट ने घेतली आहे. नव नवीन तंत्रदान उदयास येत आहे,अशा वेळेस जसे फायदे बघितले जातात तसे काही त्रुटी अथवा विपरीत घटक ही या चांगल्या गोष्टींवर परिणाम करतात त्यांना आळा घालण्यासाठी किंबहुना या तांत्रिक गोष्टीना इजा पोहचू नये यासाठी त्यावर विशिष्ट पद्धतीने ,कार्यप्रणालीने अंकुश ठेवणे अथवा त्याला बाधा पोहचू नये म्हणून सेक्युअर करणे ही क्रमप्राप्त ठरते यासाठी विशिष्ट यांत सामुग्री सुद्धा उपलब्ध असते. आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगाने खूप मोठी प्रगती केली आहे .इंटरनेट ने खूप मोठे जाळे आज पसरविलेले आहे माहितीची देवाण घेवाण असो वा दैनदिन व्यवहार अथवा करमणूक या सह सर्वच क्षेत्रात आज हे जग यावर अवलंबून आहे. शिवाय या सायबर युगात आता सर्व व्यवहारही डीजीटल माध्यमातून घडत आहे. म्हणून आजच्या या सायबर जगतात वावरताना त्याचे सेक्युरीटी जपणे तेवढेच जिकरीचे झाले आहे.त्यामुळे या बाबतीत शिक्षित असणे ही काळाची गरज बनली आहे .
यावेळी पाचोरा पोलीस स्टेशन चे PSI योगेश गणगे सर, शाळेचे मुख्याध्यापिका सौं वाघ मॅडम, पर्यवेक्षक श्री आर एल पाटील सर, युनिक कॉम्प्युटर्स चे संचालक प्रा स्वप्नील ठाकरे सर,तसेच शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तडवी सर यांनी केले तर आभार कुमावत सरांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377