फार झाले आता तर अती झाले यापुढे सहन करणे शक्य नाही , पाचोरा सह शेजारील तालुक्यांचे नागरिकांची आर्त हाक!
पाचोरा, दि.7 -जळगाव -पाचोरा- चाळीसगाव रस्ता तयार करणे प्रारंभ झाल्यानंतर पंचक्रोशितील नागरीकांना आनंद झाला उशिरा का असेना भारत स्वातंत्र्यानंतर जळगाव-पाचोरा- चाळीसगाव रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट कॉक्रीटचे रस्ते तयार करणे सुरु झाल्याचे बघुन सर्व स्तरावर कौतुक केले जात होते किंबहुना यासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान देण्याची देखील तयारी दर्शविली परंतु गेल्या दिड वर्षापासुन रस्त्याचे काम अर्थवट स्थितीत सोडून देण्यात आले किंबहुना रस्ता तयार करणाऱ्या कंपनी देखील आपले ताम- झाम गुंडाळून पसार झाली? ,परीणामतः या अर्धवट कामाचे भोग पर्यायाने जनतेला भोगावा लागत आहे जळगाव-पाचोरा- चाळीसगाव रस्त्याची दुर्दशा बघता जनतेचा सहनशिलतेचा अंत झाला आहे.
सदर रस्ता जरी NHAI कडे असला तरी ज्या कंपनीला या रस्ता कामाचे कंत्राट मिळाले होते व काम झालेही परंतु सदर रस्त्या मध्ये अनेक ठिकाणी काही किलोमीटरचा भाग, तसेच पुल बांधून झालेवरील दोन्ही बाजूचे रोड आणि उर्वरित आधीचा रोड यातील अंतरात गॅप असणे,अनेक ठिकाणी खटकी पडलेल्या असताना ते कामही सदर कंपनी करीत नाही असेच दिसत आहे. रोड झाल्या पासूनच अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या दिसतात.पाचोरा ते भडगाव जाताना असलेल्या पुलावरील ऐक ब्लॉक पुन्हा करावा लागला ही नामुष्की ही लपविता येण्या सारखी नाही याचा बोध होणेही गरजेचेच.या रस्त्याच्या बाबत विशाल झाडे सदर कंत्राटदार कंपनीच्या कर्मचारी यांचेकडे तसेच NAHI चे धुळे येथील अभियंता वाघ यांचे कडे तक्रार केली असता या बाबत PWD मुंबई येथील ऑफीस मध्ये कामाचे परवानगी व अंदाजपत्रक मंजूर झाले की सदर काम केले जाईल असे सांगण्यात येते. शिवाय अनेक ठिकाणी रोड पूर्ण न करण्यामागील कारण शेतकरी रोड होऊ देत नाही भूसंपादनची अडचण दाखवून वेळ मारून नेली जात आहे. सदर रस्त्यावरील खड्डे, अपूर्ण कामे, वळणावरील मातीचे/धुळीचे रस्ते यामुळे अनेक वेळेस अपघात होतात.तरीही या अधिकारी व कंत्राटी कंपनीस काहिही फरक पडत नाही.रस्त्याच्या कडेला किती झाडे लावली किती जगली याचीही आता मोजणी करावी लागेल असेच चित्र निर्माण झाले आहे.शिवाय अनेक अत्यावश्यक ठिकाणी ब्रेकर करणे साठी ,तक्रार अर्ज दिला गेला परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले ही खेदाची बाब नमूद करण्यासारखी आहे.
आता या प्रकरणी योग्य निर्णय व अंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी क्षत्रीय ग्रुपच्या वतीने रविवार दि.११ डिसेबर २०२२ रोजी पाचोरा येथील हुतात्मा स्मारकात दु.4-00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व सामजिक संघटना & राजकीय पक्षीय मान्यवरांसह, पत्रकार बांधव व नागरीकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन पाचोरा येथील क्षत्रीय ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377