आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

महापुरूष सन्मान समितीच्या माध्यमातुन पाचोरा शहर व तालुका सर्व समावेशक कडकडीत बंद



पाचोरा, दि.14- महाराष्ट्रात सद्या सुरू असलेल्या वाचाळ विरांच्या निषेधार्त महाराष्ट्रभर निषेध मोर्चे व बंद पुकारण्यात येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर पाचोरा शहरात देखील सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या संघ मताने महापुरुष सन्मान समिती गठीत करण्यात आली. समितीचे अध्यक्ष
स्थान हे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनिल पाटील सर यांच्या हस्ते महापुरुषांना माल्यार्पण करून सकाळी ७ वाजे पासून तर सायं. ७ वाजेपर्यंत काळे फित लावुन निषेध पुकारण्यात आले. सदर बंदसाठी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली व व्यापारी वर्गाने उर्सुकपणे सदर बंदला पाठिंबा दर्शवला व बंद हा लोकशाही मार्गाने बंद पाळण्यात आला. यावेळेस अनिल लोंढे, फईम शेख,पप्पु राजपूत, मुकेश तुपे, संतोष महाजन, कन्हैया देवरे, सुधाकर वाघ, अशोक मोरे, अजहर खान, आकाश नन्नवरे, आनंद बागुल, विठ्ठल महाजन, एकनाथ सदानशिव, एकनाथ महाजन, संजय महाजन, अनिल पवार, जय वाघ, प्रविण ब्राम्हणे, दिपक शेजवळ, ईश्वर डोंगरे, कपिल पाटील, सईद शेख, साबिर देशमुख, सलिम शहा, अखत्तर अली, पिंटु कोळी,सुनिल मोरे, सुनिल कदम, उदय पाटील, अनिल सावंत, प्रताप पाटील, संतिष ब्राम्हणे, संतोष कदम, सुनिल महाजन, नाना महाजन, मयुर महाजन, मार्गदर्शक – खलिलदादा देशमुख, सुनिल शिंदे, अविनाश भालेराव, ॲड- आण्णा भोईटे, भरत खंडेलवाल, गणेश पाटील, मुजाहीद खान, बसिर दादा बागवान, नसिर दादा बागवान, धनराज पाटील भाऊसाहेब, वासुदेव महाजन, विकास पाटील, हरीभाऊ पाटील, भालचंद्र ब्राम्हणे, हरीष आदीवाल अशा मान्यवरांनी मार्गदर्शन करत राजकिय पक्षांनी देखील आपले मोल्यवान सहकार्य दाखवले सदर बंदसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संजय नाना वाघ, रणजित पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – वैशालीताई सुर्यवंशी, नरेंद्र सुर्यवंशी, दादाभाऊ चौधरी, संजय चौधरी, अजय पाटील, शिंदे गटाचे – किशोर बारावकर आणि राष्ट्रीय कॉग्रेसचे सचिन दादा सोमवंशी, अमजद पठाण, इरफान मन्यार, ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, गणेश पाटील, तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील, तेली समाजाचे अध्यक्ष – सतिष चौधरी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष गोर्वधन जाधव, एकता ॲटो युनियनचे अध्यक्ष एकनाथ संदाशिव, सुधाकर महाजन, पप्पु जाधव, अशोक निबांळकर, वंचित बहुजन आघाडीचे विशाल बागुल, संतोष कदम भारतीय बौध्द महासभेचे राजु खर्चाने, भाऊराव पवार, आधार सोनवणे, किरण अहिरे, बंजारा समाजाचे – राजु राठोड, आर. पी. आय. चे विनोद अहिरे, शशीकांत मोरे, कोळी महासंघाचे सुनिल मोरे या सोबत शहरातील सर्व सराफ असोशिएशन सर्व व्यापारी असोशिएशन, सर्व किराणा दुकानदार असोशिएशन, सर्व कापड दुकानदार असोशिएशन, सर्व भाजीपाला विक्रेते,संत सेना महाराज नाभिक संघटना सर्व शैक्षणिक संस्था,सर्व लहान मोठे हॉटेल व्यवसाईक, सर्व कटलरी व स्टेशनरी विक्रेते, पाचोरा तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक, प्रिंट व सोशल मिडीयाचे पत्रकार बंधु व भगिनी यांनी पाचोरा शहरबंदला उर्सुक सहभाग नोंदवुन वाचाळ विरांचा जाहीर निषेध केला. तसेच संरक्षणाच्या दृष्टीकोनातुन या पुकारण्यात आलेल्या बंदला कुठेही काही गालबोट लागु नये म्हणुन पाचोरा पोलिस प्रशासनाने विशेष सहकार्य केले. व या बंद चा समारोप करतांना महापुरूष सन्मान समिती कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक – किशोर डोंगरे यांनी आभार व्यक्त करत सदर घटना व वाचाळवीर यांची महापुरूषां बद्दलची वक्तव्य निषेधार्थ असुन हे प्रकार लवकरात लवकर न थाबल्यास सदर बंद हा जन आंदोलनात निर्माण होइल असे ही शासनाला निर्दशनात आणुन दिले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\