पाचोरा तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 14 डिसें. रोजी पाचोरा बंदला जाहीर पाठींबा.
पाचोरा,दि१३- महाराष्ट्रात सध्या भाजपा अर्थात संघाच्या माध्यमातून महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा एक सपाटा सुरु आहे असेच म्हणावे लागेल. मग भाजपा प्रवक्ता सुधांशु ञिवेदी असो की राज्यपाल भगत सिंह कोशियारी किंवा काल-परवा छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,आणि शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात अपमान जनक शब्दांचा वापर करणारे चंद्रकांत पाटील. सातत्याने समाजा मध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करुन राज्याचा वातावरण दुषित करणाऱ्या वाचाळ विरांच्या विरोधात 14 डिसेंबर रोजी पाचोरा शहरातील सर्व सामाजिक संघटनानीं पुकारलेल्या पाचोरा बंदला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पुर्ण पाठिंबा आहे.
या बाबत नितीन तावडे. (विधानसभा क्षेत्र प्रमुख),विकास पाटील (तालुकाध्यक्ष),अज़हर खान (शहराध्यक्ष) यांनी कळविले असे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377