आम आदमी पार्टीचे शिरसाळे ता अमळनेर येथे शाखा उद्घाटन संपन्न!
अमळनेर सदर तालुक्यातील पहिल्या शाखा उद्घाटनास पंचक्रोशीतील जनतेचा उदंड प्रतिसाद.
अमळनेर- तालुक्यातील आम आदमी पार्टीच्या पहिल्या शाखा उद्घाटन व फलकाचे अनावरण भल्या मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.21/ 12/ 2022/ रोजी झालेल्या या शाखा उद्घाटन व फलक अनावरणावरणाच्या कार्यक्रमात, बालगोपाळ, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवा तरुण मित्रमंडळींनी, पुढाकार घेत आम आदमी पार्टी चे ध्येय धोरण समजून घेऊन भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, दर्जेदार शिक्षण, मोहल्ला क्लिनिक, लाईट बिल, बेरोजगार प्रश्न आदी बाबत वाटचाल करणाऱ्या आम आदमी पार्टीचे स्वागत केले!
समस्यांचे समाधानकारक मार्ग काढू शकेल तर आम आदमी पार्टीच! अशा भावना शेकडो नागरिकांनी शिरसाळे गावातून व्यक्त केल्या, तसेच गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक बाल, गोपाल, महिला भगिनी, युवा तरुण या सर्वांनी शिरसाळे गावात पक्षाचे स्वागत केले.
पंचक्रोशीतील नागरिकांनी आम आदमी पार्टी शाखेचे अति उत्साह व आनंदीत वातावरणात स्वागत करताना आम्ही आमच्या गावात घरोघरी, आणि सर्व पंचक्रोशी मध्ये आम आदमी पार्टीचे विचारधारा पोहचवू अशी ग्वाही दिली.
या वेळी जिल्हा अध्यक्ष प्रा. तुषार निकम , धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, डॉ महेश पवार, तालुकाध्यक्ष संतोष पाटील, शिवाजी पाटील, प्रा,गणेश पवार, एन के पाटील, नाना अभिमान पाटील, राजेंद्र भाऊराव पाटील, रवींद्र बाबुराव पाटील, स्वप्निल नवल पाटील, नारायण पितांबर पाटील, रामकृष्ण देवरे, महेंद्र नाना साळुंखे, दीक्षा साळुंखे, मनीषा नारायण पाटील महिला तालुका अध्यक्ष, लियाकत वायरमन, ज्ञानेश्वर पाटील एरंडोल सचिव, भावेश पाटील, तसेच अमळनेर तालुक्याचे व ग्रामीण क्षेत्रातील सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी आम आदमी पार्टीच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. स्थानिक नागरिकांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
नारायण पितांबर पाटील यांनी सर्व आलेले मान्यवरांचं जाहीर सत्कार करून आभार व्यक्त केला. या वेळी शिरसाळे गावातील रामलाल वंजी पाटील, गोरख रावन पाटील. विनायक सोमा पाटील, दगा लाला पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिलिप जैन, नारायण कोळी, दिलिप कुंभार, अजित शेख, जगन पारधी, श्याम जाधव, भिकन खाटीक, भाऊसाहेब चौधरी, शालीक भिल, शोभा पाटील, मंगला पाटील, वैशाली कोळी, मंगला महाले, नूतन पाटील, देवकाबाई भिल, वजाबाई शिंदे, भिकुबाई सैदाने, उषाताई भिल, वंदना पाटील व सर्व शिरसाळे येथिल पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377