
बारीकराव जयराम पाटील यांचा परीवारासहित न्याय मिळविण्यासाठी 26 जानेवारी पासून उपोषणाचा ईशारा
पाचोरा- बाळद.बू.ता पाचोरा येथील शेतकरी बरिकराव जयराम पाटील यांना नुकताच त्यांच्या शेतीमध्ये कपाशी वेचताना दी 22/12/2022 रोजी महावितरण च्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन शॉक लागला होता .ते बेशुद्ध अवस्थेत असताना पाचोरा येथील सरकारी दवाखान्यात त्यांना ऍडमिट करण्यात आले.

वेळीच प्राथमिक उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले परंतु जर वैद्यकीय उपचार वेळेवर मिळाले नसते तर काय.अशावेळी ज्या घटना घडत असतात ज्यामध्ये इलेक्ट्रिक शॉक किंवा विद्युत प्रवाह असलेल्या तारांचा स्पर्श होऊन शेतकरी अथवा शेतकऱ्यांची जनावरे ,पशुधन हे मृत होत असते त्यावेळी जबाबदार कोणाला धरावे, शेतकरी हा शेतामध्ये राब राब राबत असतो काबाड कष्ट करत असतो. आपली उपजीविका असल्याने त्याला शेती शिवाय पर्याय नसतो परंतु अशा कष्टाळू प्रामाणिक व्यक्तीला योग्य वेळी त्याचे काम होत नसेल तर त्याने जीवन जगावे तरी कसे. सदर शेतकरीस शॉक लागल्याचे कारणीभूत वा कर्तव्यात कसूर केलेल्या व्यक्तींना ,अधिकाऱ्यांना दोषी का धरण्यात येऊ नये असा जनसामान्यात प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. संबंधित बाळद बू येथील शेतकरी वीज प्रवाहीत तारांचे शॉक ने बेशुद्ध होऊन परलोकीचा त्यांचा प्रवास सुरू झाला होता परंतु दैव बलवत्तर म्हणून काय तर प्राथमिक उपचारांती त्यांची ही परलोकीची यात्रा भूलोकावरच थांबली.परंतु या प्रवासासाठी कारणीभूत ठरलेल्या किंबहुना हा प्रवास त्यांचा घडावा म्हणून विद्युत तारा शेतात ग्राउंड लेव्हल ला जशाच्या तशा लोंबकळत ठेवणाऱ्या, वारंवार अर्ज फाटे, तक्रारी करूनही शेतकऱ्याला दाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर, मृत्यू घडून येण्यास कारणीभूत ठरने किंवा कर्तव्यात कसूर म्हणून गुन्हे दाखल होऊ शकतात याची सर्वस्वी जबाबदारी आता शासन- प्रशासन यांच्यावर येऊन ठेपली आहे किंबहुना ज्या शेतकऱ्याला या मरण यातना सहन कराव्या लागल्या त्यास कारणीभूत असलेले जे काही घटक असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.सदर व्यक्ती आज मृत पावली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता याबाबत अधिकारी यांना जाण असतानाही ते सदर तक्रारीचे निवारण करू शकले नाही ही बाब अतिव गंभीर आहे याची दखल आता वरिष्ठ अधिकारी व शासनाने प्रशासनाने घेऊन कायदेशीर मार्गाने जे काही तत्पर कारवाई शक्य होईल ती करायला हवी याच रास्त अपेक्षेने प्राण वाचलेले शेतकरी व त्यांचा परिवार यांनी या बाबतचे निवेदन आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिलेले आहे. तसेच महावितरण च्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे व सदर ठिकाणी असलेल्या तारा व्यवस्थित उंचावर न करण्यासाठी ज्या काही लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम न करण्याचा सल्ला दिला असेल अशांवरही शासकीय कामात अडथळा आणल्या बाबतचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,जेणेकरून अशा घटना कुणा सोबतही पुढील काळात घडणार नाही. सदर अर्जदाराने जर माझ्या मागणीप्रमाणे संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास येत्या 26 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला आहे.सदर घटनेबाबत परिसरातून माहिती जाणून घेतले असता पीडित शेतकऱ्या विषयी हळहळ व्यक्त होत असून त्यांना न्याय मिळावा याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



