आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित रंगभरण चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद


पाचोरा, दि 24 – येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून रंगांची उधळण केली.
स्पर्धेच्या सुरुवातीला निर्मल फाउंडेशनचे अध्यक्षा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून रंगभरण स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेसाठी वर्गनिहाय वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते इ.1 ली ते 4 थी साठी ‘अ’ गट,इ.5 वी ते 7 वी करिता ‘ब’ गट,इ. 8 वी ते 10 वी साठी ‘क’ गट आणि इ. 11 वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ड’ गट असे वर्गीकरण करण्यात आले होते. स्पर्धेला सुमारे 1052 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थीकडून आपापल्या कले द्वारे चित्रामध्ये रंगांची उधळण करण्यात अतिशय मग्न होते.
वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात व अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन खूप महत्त्वाचे असते असे नमूद केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, रमेश बाफना, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत, शहरप्रमुख दिपक पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन, युवासेनेचे हरेश देवरे, प्रशांत पाटील, जगदीश महाजन, फकीरचंद पाटील माजी नगरसेवक दत्ताभाऊ जडे, अभिषेक खंडेलवाल, कृष्णा व्यास, जितेंद्र जैन, किरण पाटील, प्रतीक पाटील, माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी, आनंद संघवी, बंडू पाटील, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
श्री. गो से हायस्कुल चे कलाशिक्षक सुबोध कांतायन सर , श्रीमती के. एस. पवार आश्रमशाळा वरसाडे तांडा चे परशुराम पवार सर,अ. दि चित्रकला महाविद्यालय, पाचोरा चे संदीप पाटील सर, प्रदीप सोनार सर,निलेश शिंपी सर प्रशांत सोनवणे सर यांच्यासह निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक नाना वाघ यांनी केले तर उपस्थितांचे आभार फकीरचंद पाटील यांनी मानले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि.28 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वा.’शिवतीर्थ’ जय किसान कॉलनी, भडगाव रोड,पाचोरा येथे करण्यात येणार आहे असे आयोजकांकडून नमूद करण्यात आले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!