पाचोरा – दिनांक 23 रोजी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे पाचोरा येथील शिवतीर्थ या शिवसेना कार्यालय तसेच शिवसेना शहरप्रमुख अनिल सावंत यांच्या संपर्क कार्यालय येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त समस्त युवासेना पाचोरा तालुका यांच्या वतीने तसेच सौ.वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नाथमंदिर,जारगाव येथे आयोजित करण्यात आला होता. रक्ताचा थेंब आहे मौल्यवान,याची असावी सर्वाना जाण म्हनुन करावे रक्तदान हा मुलमंत्र लक्षात घेऊन सर्वानी रक्तदान केले.शिबिरात सुमारे ३१ रकतदात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख उद्घव मराठे, रमेश बाफ़ना, तालुकाप्रमुख शरद पाटील,उपजिल्हासंघटक धर्मराज पाटील ,तालुका संघटक देवीदास पाटील, उपजिल्हा समन्वयक विनोद बावीस्कर, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत, दिपक पाटील, माजी नगरसेवक दत्ता जडे व शहर संघटक राजेंद्र राणा, एकता रिक्षा युनियनचे संस्थाक अध्यक्ष अनिल पवार, माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी व शहर समन्वयक बंडु मोरे, युवासेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन, युवासेना तालुकाप्रमुख भुपेश सोमवंशी , युवासेना शहरप्रमुख हरीश देवरे, प्रशांत सोनार, गौरव पाटील, संजय चौधरी, जगदिश महाजन, जितेंद्र जैन, पप्पू जाधव, फ़ईम शेख़, अजय पाटील, महेंद्रसिंग पाटील, कैलास पाटिल, कृष्णा पाटील,अभिषेक खंडेलवाल, आनंद जैन, खंडू सोनवाने, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सुनील पाटील, महेश पाटील, समाधान पाटील, मनोहर पाटील, प्रतीक पाटील, हिमांशु पाटील, ओम पाटील, अकबर आली, संजय चव्हाण, जिवन मराठे, रोहण राजपुत, संजय चौधरी, योगेशपाटील, पृथ्वीराज पाटील, बबलू भोई महिला आघाडीच्या मंदाकिनी पारोचे, शितल मोराणकर, स्वाती देसले, सरिता पुराणिक जयश्री येवले अनिता पाटील, प्रितेश जैन, शशिकांत पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख चंदू पाटील, गौरव पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख निलेश गवळी संदीप पाटील बापू पाटीलसंतोष पाटील सर, नाना वाघ, शुभम पाटील,आनंद संघवी, जगदीश पाटील आदिसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377