नगरदेवळ्यात लोकसेवा कार्यालयचे थाटात उद्घाटन
नगरदेवळा ता.पाचोरा,दि,२६- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या सोयी सुविधेसाठी लोकसेवा केंद्र व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाचोरा-भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते रविवारी दुपारी १२ वाजता करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.शिवसेना पक्षाकडून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाचा अवलंब करण्यात येत आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या पक्षाने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आवाज उठविला आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र आणि मराठी माणूस याच्यासाठी सुरू ठेवलेला लढा आजही कायम आहे. हेच गुण अंगीकारत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नगरदेवळा येथे लोकसेवा केंद्राची सुुरवात केली असून यामुळे गोरगरीब जनतेला व गरजू लाभार्थ्यांना तालुक्या सारख्या ठिकाणी वणवण भटकावे लागणार नाही शिवाय त्यांच्या वेळेची व खर्चाची देखील बचत होणार आहे या कर्यालयात नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोदणी, आधारकार्ड, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना, पीकविमा योजना, शेतकरी गट बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी बद्दल माहिती, रोजगार स्वयरोजगार बद्दल माहिती, सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती यासह अनेक लोकाभिमुख व समाज उपयोगी योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळणार आहे.दरम्यान कार्यक्रमात त्यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, सुधाकर महाजन, शिवनारायण जाधव, गणी शेट, वसंत जिभु पाटील, अविनाश कुडे, बचत गटाच्या अध्यक्षा अंजली चौहान, प्रदिप परदेशी, प्रकाश परदेशी, नुर बेग, सागर पाटील, रवींद्र पाटील, भैया महाजन, धनराज चौधरी, रोशन जाधव, सूनील महाजन, प्रदिप भोई, तसेच नगरदेवळा बाळद गटातील सर्व सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रंचालन व आभार अविनाश कूडे यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377