आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

झेरवाल अकॅडमी मध्ये झालेल्या विज्ञान जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा – दि.28 फेब्रुवारी विज्ञान दिनानिमित्त 27 फेब्रुवारी 2023 रोजी झेरवाल अकॅडमी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान जत्रेमध्ये पाचोरा शहर तथा पाचोरा तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी भाग घेतला व विविध पोस्टर प्रेसेंटेशन व मॉडल प्रेझेंटेशन केले.

डॉ सी व्ही रमण यांच्या जागतिक शोधा निमित्त 28 फेब्रुवारी 2023 हा दिवस संपूर्ण भारतभर विज्ञान दिवस म्हणून ओळखला जातो. आकाश निळे का दिसते या प्रश्नाचे उत्तर सर्वप्रथम भारतातील शास्त्रज्ञ डॉ सी व्ही रमण यांनी 1928 मध्ये दिले. त्यामुळे त्यांना मध्ये 1928 मध्ये नोबल पारितोषिक जाहीर करण्यात आले तसेच 1929 मध्ये त्यांना ते प्रत्यक्ष देण्यात आले.

या या विज्ञान दिनाच्या निमित्त 27 फेब्रुवारी 2023 रोजी पाचोरा शहरातील झेरवाल अकॅडमी येथे विज्ञानाची जत्रा भरवण्यात आली होती यामध्ये पाचोरा शहरातील गुरुकुल इंग्लिश मीडियम, नवजीवन माध्यमिक विद्यालय, पि. के शिंदे माध्यमिक विद्यालय , गो. से. माध्यमिक विद्यालय इत्यादी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा अमोल झेरवाल यांनी केली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवजीवन हायस्कूलचे विज्ञानाचे शिक्षक रवींद्र चौधरी सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रेम शामनानी सर, नवजीवन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सुनील परदेशी सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी अनेक शाळेतील शिक्षक व शिक्षिका बंधू-भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात अनेक पालकांनी भेटी दिल्या व सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. सॅटॅलाइट लॉन्चिंग, स्पायडर, हायड्रोलिक लिफ्ट, शोल्डर मशीन यासह अनेक छान मॉडेल विद्यार्थ्यांनी बनवले होते. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी पोस्टरवर प्रेझेंटेशन केले. सदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी तुषार वानखेडे क्रिएशन्स च्या चैतन्या महाजन, मानसी पाटील, प्रेम मोरे, प्रथमेश ठाकूर, तुषार वानखेडे यांनी तसेच पंकज पवार, अर्जुन राठोड, निखिल पंजाबी, हिमांशू पाटील, शंतनू पाटील, राधा मोरे, स्वयम भावसार, स्वरा भावसार, कुणाल चांगरे, इत्यादी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे परीक्षण नवजीवन शाळेचे विज्ञानाचे शिक्षक रवींद्र चौधरी सर व सुनील परदेशी सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन झेरवाल अकॅडमीच्या संचालिका प्रा गायत्री अमोल झेरवाल यांनी केले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\