खा.राहुल गांधीच्या समर्थनार्थ काँग्रेस जनता दरबारात -ता.कॉंग्रेस निरीक्षक देवेंद्र पाटील

पाचोरा – मोदी सरकार चा वाढता अतिरेक देशात वाढता भ्रष्टाचार या कडे जनतेने दुर्लक्ष करावे म्हणून संसदेतील राहुल गांधी चा आवाज दाबण्या विरोधात जनतेच्या दरबारात जाउन लढाई लढली जाईल असे प्रतिपादन देवेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले
देशातील वाढते घोटाळे आणि अदानी उद्योग समूहाला संपुर्ण देशातील मालमत्ता देणारे मोदी सरकार च्या विरोधात खा. राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला म्हणून त्यांचा आवाज बंद करुन खासदारकी रद्द करण्या पर्यंत भाजपा प्रणित मोदी सरकार ची मजल गेली आहे या विरोधात ग्रामीण भागातील जनते पर्यंत जाण्याचे कॉंग्रेस ने ठरवले आहे असे प्रतिपादन पत्रकार परिषदेत तालुका कॉंग्रेस निरीक्षक देवेंद्र पाटील यांनी केले यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, आरोग्य सेवा सेल जिल्हा सरचिटणीस डॉ अनिरुद्ध सावळे, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, एस सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, जिल्हा महिला उपाध्यक्षा संगिता नेवे, अॅड मनिषा पवार, ओबीसी शहर अध्यक्ष शरीफ शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे,शिवराम पाटील, तालुका उपाध्यक्ष इस्माईल तांबोळी, अमजद मौलाना, भगवान पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, कॉंग्रेस चे नेते खा. राहुल गांधी संसदेत अदानी उद्योग समूहा मध्ये विस हजार कोटी रुपये गुंतवणूक कुणाची देशातील सर्व सामान्यांना सह गोरगरिबांना चे पैसे मोदी सरकार ने केली या विरोधात आवाज उठवताच राहुल गांधी यांच्या खासदारकी विरोधात सत्ताधारी यांनी षडयंत्र रचुन आधी खासदार की रद्द नंतर बंगला खाली करावयांस सांगितला ही लोकशाही च्या देशात भयानक घटना घडली आहे. संपूर्ण देशाची संपत्ती एकच उद्योग समूहाला देणे म्हणजे देशाला गरीबी कडे नेणे असलेल्याचे श्री पाटील यांनी स्पष्ट करुन कॉंग्रेस देशातील लोकशाही, संविधान व देश वाचविण्यासाठी ही लढाई आहे. कॉंग्रेस ही लढाई जनतेच्या दरबारातही लढेल व विजयी होईल . असे श्री पाटील यांनी शेवटी सांगितले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



