आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
राजकीय
Trending

महाविकास आघाडी पॅनल लढणार कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव.


पाचोरा, दी.11- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदार बंधू भगिनींना महविकास आघाडीने आवाहन करीत आपली भूमिका आज स्पष्ट केली असून आता लढाई ही शिवसेना(शिंदे गट) आणि भाजपा(शिंदे गट पाचोरा वगळून )अशी होणार असल्याचे दिसत आहे.
पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व वि. का. सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि व्यापारी, हमाल मापाडी बंधू आणि भगिनी मतदारांना म. वि.आ ने निवेदनाद्वारे नम्र आवाहन करीत पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा थोडक्यात इतिहास या ठिकाणी मांडला आहे.

सहकार महर्षी सर्वश्री माजी आमदार अप्पासाहेब जे. एस. पाटील (सोमवंशी) आण्णासो. गुलाबराव पवार, कै. सुपडू अण्णा पाटील, कै. के.एम. बापू पाटील, कै. ओंकार आप्पा वाघ, कै. आर. ओ. तात्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 75 वर्षाच्या वाटचालीत आपणा सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सर्व आवश्यक सेवा शेतकरी बांधवांना पुरवणाऱ्या या संस्थेच्या पाठीशी उभे राहून नेतृत्व करणाऱ्या दिवंगत मान्यवरांनी सातत्याने योग्य संचालक मंडळ देऊन मार्केट कमिटीचा विकास केला. दुर्दैवाने मतांच्या निवडणुकीत 100% प्रत्येक बाबतीत (शेतकरी हिताला बाजूला सारून) स्वतःच्या स्वार्थ आणि उद्योगधंदा समजणाऱ्या काही लोकांच्या ताब्यात मार्केटची सत्ता गेली. आणि शेतकरी हिताला बाजूला सारून मार्केटच्या जागेत काळेबेरे उद्योग करून स्वतःच खाजगी टोलेजंग शॉपिंग मॉल उभे केले. शेतमालाचे वाढणारे उत्पादन आणि उपलब्ध सुविधा यांचा विचार केल्यास, आहे ती जागा मार्केटला अपूर्ण भासत आहे. आणि पुन्हा या लोकांच्या हातात सत्ता गेली तर उर्वरित सलग जागेला सुद्धा शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे. अत्यल्प दरात मार्केटचे भूखंड मार्केटच्या ताब्यातून जातील.
या अतिशय गंभीर बाबीचा विचार सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल, ग्रामपंचायत सदस्य अर्थात मार्केटच्या सर्व मतदार बंधू भगिनींना करावा लागणार आहे. आम्ही सर्व मतदारांच्या प्रेमाच्या जोरावर हा डाव हाणून पाडण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. आपणा सर्वांच्या मदतीची गरज आहे. आपल्या भेटीदरम्यान या बाबी आपल्यासमोर स्पष्ट करूच आणि विविध पत्रकांच्या माध्यमातून इतर अनेक बाबींची माहिती आपल्यासमोर मांडू. महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही हे “महाविकास आघाडी पॅनल” शेतकऱ्यांच्या हितार्थ तयार केले आहे, तरी आपल्या सर्व मतदारांच्या सहकार्याची अपेक्षा करीत आहोत. असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या वेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यात मा.आ. दिलीपभाऊ वाघ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
मा. वैशालीताई सूर्यवंशी नेत्या, शिवसेना (उबाठा),
मा. प्रदीपराव पवार जिल्हाध्यक्ष तथा नेते , राष्ट्रीय काँग्रेस सचिन सोमवंशी राष्ट्रीय काँग्रेस. या सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\