आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोरा -भडगाव कृ.उ.बाजार समितीवर गणेश पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागणार ?

पाचोरा,दि 1- पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 ही चांगलीच चुरशीची झाली यात कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने 9 जागा जिंकत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.तर मा.आ दीलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, सचिन सोमवंशी यांची मविआला 7 आणि  अमोलभाऊ शिंदे (भाजपा गट) परिवाराचे 2 अशी परिस्थिती असताना सभापती पदासाठी किमान दहा जागांची आवश्यकता आहे तरी सभापती हा शिवसेना शिंदे गट व भाजपा(एक गट ) युतीचे शेतकरी विकास पॅनलचा होणार याबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सभापती पदासाठी एक जागेची आवश्यकता आहे असे असले तरी राजकारणात काहीही घडू शकते याची प्रचिती मविआ सरकार कसे बदलले आहे हे सर्वांनीच बघितला आहे शिवाय राजकारणात अनेक हतखंडे वापरून इच्छित कार्य पार केले जाते यात काही शंका नाही.किंबहुना एखादा संचालक राजीनामा देणे अथवा कुणाचे संचालक पद जाणे हे काळ ठरविणार आहे.कारण “जिनके घर शीशे के होते हे वो दुसरो के घरोंपर पत्थर नही मारा करते”

सभापती पदासाठी आ.किशोरआप्पा पाटील कोणाचे नाव  निवड करतात यावर  दृष्टीक्षेप टाकता, चर्चा होता जे नाव समोर येऊ पाहते ते सर्वात जुने व राजकारणाचा गाढा अभ्यास असलेले,उच्च शिक्षित व संघटनेसाठी पूर्ण वेळ देणारे व जनसामान्यात वावरणारे शिवाय आ.किशोरआप्पा पा. यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा पासून त्यांचे सोबत असलेले असे निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन आजही सर्वतोपरी पक्ष संघटने सोबत काम करीत आहे व निवडून आलेल्यांन मध्ये सिनियर देखील आहेत व पाचोरा न.पा नगरसेवक देखील  होते त्यामुळे प्रशासकीय कारभार हाताळण्यातही तरबेज आहेत असे प्रा गणेश भिमराव पाटील हे नक्कीच सर्वांच्या पसंतीचे सभापती असतील. किंबहुना आज ज्यांच्या नावाची कृ.उ.बा.समिती सभापती म्हणून चर्चा होत आहे तेच सभापती खुर्चीवर विराजमान होतील ही सामान्य शिवसैनिकांची रास्त अपेक्षा फलीत होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

परंतु सभापती पदासाठी सुनील पाटील व पूनमताई पाटील हे दोन नावे देखील प्रकर्षाने पुढे येत आहेत अशा परिस्थितीत प्रत्येकाला समान कार्यकाळात विभागणी करणे असा पर्याय देखील नाकारता येनार नाही जेणे करून सर्वांनाच संधी मिळून शेतकरी हितासाठी चांगले निर्णय घेऊन बाजार समितीचा प्रगतीचा आलेख वाढता राहील.राजकीय परिस्थितीत काय बदल होतात यावर सर्व गोष्टी अवलंबून असणार आहे यात तीळ मात्र शंका नाही.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

   

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!