पाचोरा नगरपालिकेचे प्रशासकिय अधिकारी प्रकाश दत्तात्रय भोसले 37 वर्षे सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त

पाचोरा- येथील नगरपालिकेचे प्रशासकिय अधिकारी प्रकाश दत्तात्रय भोसले हे सेवेची 37 वर्षे पुर्ण करुन पाचोरा नगरपरिषदेच्या प्रदिर्घ सेवेतून दिनांक 30/04/2023 रोजी सेवानिवृत्त झालेत. या प्रित्यर्थ त्यांचा सेवापुर्तीचा कार्यक्रम दिनांक 28/04/2023 रोजी सकाळी 11-00 वाजता महालपुरे मंगल कार्यालय येथे पार पडला. कार्यक्रमास मोठया संख्येने नगरपालिका कर्मचारी, नातेवाईक मित्र मंडळी आदि उपस्थित होते.
मंचावर संजय नाना वाघ, संजय गोहील, वाल्मिक पाटील, डॉक्टर भोसले शिरीष कुमार डी., माजी प्राचार्य नवल पाटील, दिलीप पाटील ज्ञानेश्वर पाटील, धोंडू शंकर भोसले, संजय विक्रम मांडले,प्रवीण पाटील,विलास नेरकर, माजी अध्यक्ष सोसायटी ग स सोसायटी रोहिदास पाटील, राजारामशेठ सोनार, माजी उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, दगउू मराठे, डि.बी. बापू पाटील, मुख्याध्यापक मनोहर काटे, यशवंत दत्तात्रय भोसले आदी होते. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले कि, भोसले आप्पांनी इतकी वर्ष इमाने इतबारे सेवा केली, शहरातील समस्या या आपल्या घरातील समस्या म्हणून जाणून घेत त्यांचा तात्काळ निवारण करणेसाठी प्रयत्न केलेत, कोणत्साही कर्मचाऱ्याला सेवा काळात दुखावले नाही. सन.2019 मध्ये आलेल्या वैश्वीक कोरोना संकट काळात त्यांनी त्यांच्या कुशल नेतृत्वात पुढाकार घेऊन कोरोना महामाहीत सवोत्तम काम केले. कोरोना काळात तपासणी, कंटेंटमेंट झोन, कोवीड केअर सेंटर येथे कर्मचाऱ्यांची माहीती जमा करणे, तेथे कर्मचारी नियोजन करणे, कामाचे सुक्ष्म नियोजन करणे अशी कामे केली. अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.
सदर कार्यक्रमास डॉक्टर प्रतिक प्रकाश भोसले वैद्यकीय अधिकारी पिंपरखेड, प्राध्यापक हेमंत भोसले, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर चेतन शिरीषकुमार भोसले, नयन यशवंत भोसले, कौस्तुभ प्रकाश भोसले,डॉक्टर जीवन पाटील, रवींद्र पाटील, इंजिनीयर मधुकर सुर्यवंशी, जितेंद्र मोरे, संजय बाणाईत, शाम ढवळे, ललित सोनार, किशोर मराठे, गोपाल लोहार, राजेंद्र शिंपी, संदिप जगताप, कृष्णा व्यास, नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार, पत्रकार बांधव व विद्यानगर भडगाव कॉलनी आदी मोठया संख्येने उपस्थित होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



