पाचोरा – मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सी.बी.एस.ई.बोर्ड परीक्षेत इ.12 वी तून निर्मल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थ्यांनी कुमारी अनुष्का गणेश भारास्वडकर हिने 97.40% गुण मिळवून जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी, सचिव श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य श्री गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ स्नेहल पाटील यांनी तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377