पाचोरा शहरातील डॉ झेरवाल यांचे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सातव्या वर्षात पदार्पणानिमित्त रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पाचोरा – शहरातील कृष्णापुरी भागातील डॉ राहुल झेरवाल यांचे सिद्धिविनायक हॉस्पिटल ला येत्या 28 मे ला 6 वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण होत आहेत व 7 व्या वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल प्रभाकर झेरवाल यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचे रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिराचे वैशिष्ट्ये
मोफत आरोग्य तपासणी शिबीर
दि. २८ मे, वार-रविवार
शिबिरामधील डॉक्टर
डॉ महेंद्र चौधरी
M.B.B.S.MD (Medicine)
हृदयरोग व मधुमेहतज्ञ
डॉ. अंकुर झंवर
M.B.B.S., MD.DNB (Medicine) DNB (Cardiology) प्राईम हॉस्पीटल, पाचोरा
डॉ. राहुल प्र. झेरवाल B.H.M.S. M.D. CCMP (GMC Jalgaon) P.G.D.E.M.S.(Pune) Certi in Diabetology
डॉ. संदिप मोरे
M.B.B.SD.M.R.D.
निदान डायोसीस, पाचोरा
नावनोंदणी फी रु 50/-
• ठिकाण:- भारत डेअरी, जामनेर रोड, कृष्णापूरी, पाचोरा, जि. जळगाव – 424201.
पाचोरा शहरात कृष्णापुरी भागात डॉ राहुल प्रभाकर झेरवाल हे मागील 6 वर्षांपासून शहर व तालुक्यातील रुग्णांना सेवा देत आहेत. गेल्या 6 वर्षात कित्येक रुग्णांना त्यांनी पीडामुक्त केले आहे. या सिद्धिविनायक हॉस्पिटल मद्दे अनेक आजारांवर उपचार केला जातो. अनेक प्रकारच्या अत्यावश्यक सेवांचा यात समावेश आहे.
ऐन कोरोना काळात केली नॉन कोविड रुग्णांची सेवा
कोरोना काळात जवळ जवळ सर्व हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव झाले असतांना सिद्धिविनायक हॉस्पिटल चे संचालक डॉ राहुल झेरवाल यानी नॉन कोविड रुग्णांना सेवा दिली. कोरोना काळात सर्वच रुग्ण अतिशय भयभीत झाले असतांना नॉन कोविड रुग्णांना येथे सेवा मिळाल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले
अत्याधुनिक सुविधा
हॉस्पिटलमध्ये अनेक अत्यावश्यक व आधुनिक सेवा उपलब्ध आहेत. यात *डे केअर ,IPD,बालरोग विभाग,5 Para cardiac monitors,ईसीजी, एक्स-रे,Ultrasonic Nebulizer इत्यादी सारख्या सुविधा देखील रुग्णांना पुरविण्यात येतात.
अविरत सेवा देण्याचा प्रयत्न करणार: डॉ राहुल झेरवाल. 6 व्या वर्धापन दिनाविषयी सिद्धिविनायक हॉस्पिटल च्या डॉ राहुल झेरवाल यांच्याशी सपर्क केला असता त्यांनी रुग्णांची अविरत सेवा करणार असल्याचे सांगितले तसेच रुग्णांचा त्रास दूर करने हे माझे कर्तव्य असून मी गोर गरीब, गरजूंच्या मदतीसाठी व उपचारासाठी सदैव तत्पर व तयार असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377