तरुणाईला आ.किशोर अप्पा पाटील यांचे आकर्षण कायम ; कजगाव -भोरटेक येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
पाचोरा दि,२४- पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकास कामांचा झंझावाताने प्रभावित तरुणाईला आमदार किशोर अप्पा पाटील त्यांच्या नेतृत्वाचे आकर्षण कायम असून त्यांच्या कामांनी प्रभावित भडगाव तालुक्यातील कजगाव, भोरटेक येथील असंख्य तरुणांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता ‘शिवालय’ संपर्क कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी पक्षाचा भगवा रुमाल टाकून आमदार किशोर अप्पां पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. त्यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कजगाव येथील सरपंच पुत्र अनिल रघुनाथ महाजन, माजी विधानसभा प्रमुख अविनाश कुडे, प्रविण ब्राम्हणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भोरटेक येथील चेतन शितोळे, राहुल महाजन, आकाश पाटील, वरुज पाटील, शुभम महाजन, निलेश धनगर, प्रेम देशमुख, बंटी देशमुख, रवींद्र शितोळे, नंदू महाजन, अजय पाटील, अमोल पाटील, समाधान महाजन, ज्ञानेश्वर महाजन, कैलास महाजन तर कजगाव येथील सुरेश मोरे, कैलास वाघ, मच्छिंद्र मोरे, राजेंद्र सोनवणे, सुनील शिंदे, राकेश मोरे, तेजस साळुंखे समाधान अहिरे, रवींद्र मोरे, किसन सोनवणे आदी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश जाधव यांनी मानले आगामी काळात आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वातच आपण गाव विकासाची कामे करणार असल्याचा मनोदय तरुणांनी बोलून दाखविला.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377