पांडे मतिमंद निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतली जिल्हाधिकारी व पो.नी यांची भेट
श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचालित स्व कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मा. अमन मित्तल जिल्हाधिकारी महोदय यांची स्नेह भेट घेऊन आशीर्वाद घेतले.आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व दिव्यांग मुलांची अंत्यत जिव्हाळ्याने विचारपूस करून दिव्यांग विध्यार्थ्यांनी शाळेत येण्याचे निमंत्रण दिले ते त्यांनी सहज स्वीकारून शाळेला निश्चित भेट देईल असे आश्वासन मुलांना दिले. यावेळी पाचोरा प्रांत अधिकारी महोदय तहसीलदार महोदय आणि अधिकारी वर्ग तसेच संस्थेचे अध्यक्ष सौ मीनाक्षी पांडे सचिव श्री प्रदीप पांडे शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मा. राहुल खताळ पोलीस निरीक्षक महोदय यांची स्नेह भेट घेऊन आशीर्वाद घेतले. खताळ सरांनी सर्व दिव्यांग मुलांची अंत्यत जिव्हाळ्याने विचारपूस करून दिव्यांग विध्यार्थ्यांनी शाळेत येण्याचे निमंत्रण दिले ते त्यांनी सहज स्वीकारून शाळेला निश्चित भेट देईल असे आश्वासन मुलांना दिले. तसेच त्यांनी रायफल पिस्टल तसेच गॅस गन ची माहिती दिली प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच पूर्ण पोलीस स्टेशन ची इमारत दाखवून पोलीस प्रशासनाची माहिती दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौ मीनाक्षी पांडे सचिव श्री प्रदीप पांडे शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सर्वात शेवटी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. मुलांनी खताळ सर आणि पोलीस स्टेशनच्या कर्मचारी यांचे आभार मानून निरोप घेतला.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377