कृषी दिनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कै.वसंतराव नाईक यांचे प्रतिमा पूजन.

पाचोरा, दि 1- वसंतराव फुलसिंग नाईक हे एक भारतीय राजकारणी, समाजसुधारक होते ज्यांनी 1963 ते 1975 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. वसंतराव नाईक हे एक प्रख्यात शेतकरी, प्रगतीशील शेतकरी आणि राजकारणी होते. ते सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
नाईक यांचा जन्म महाराष्ट्रातील पूर्व यवतमाळ जिल्ह्यातील पुसदजवळील गहुली या छोट्याशा गावात एका समृद्ध शेतकरी कुटुंबात झाला. नाईक यांना महाराष्ट्रातील हरितक्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी म्हणाले, वसंतराव नाईक हे भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत. नाईकांचा गौरव या शब्दात केला आहे. १९७२ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी दूरगामी मदत योजना राबवल्या. वसंतराव नाईक शेतकर्यांच्या समस्यांची केवळ जाण नसून दूरगामी उपाययोजनाही करत होते. शेती आणि शेतकरी यांच्याशी त्यांची नाळ कायमच जोडलेली होती. नाईकांनी कठीण काळातही क्रांतिकारी कार्य केले. म्हणूनच त्यांना ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’, ‘हरित योद्धा’ असे संबोधले जाते.
आज कृषी दिन असल्याने पाचोळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन सभापती गणेश पाटील सचिव बोरुडे व सर्व सन्माननीय सदस्य तथा कर्मचारी यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तथा कृषी दिनाच्या अवचित्त साधत प्रतिमेचे पूजन करून त्यांनी केलेला कार्याचा यावेळी लेखा जोखा मांडण्यात आला.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा
.

.o
o
courtesy W’pe’a



