कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
जळगाव, दि. ११ :- कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
खरीप हंगाम २०२३ साठीच्या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मूग, उडीद या दोन पिकांसाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल या पिकांसाठी अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे.
पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन शासनाच्या उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377