दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण
जळगाव, दि.१९ जुलै – पुणे दिव्यांग कल्याण आयुक्तालय, सांगली जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व मिरज वसतिगृह यांच्या मार्फत दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यासाठी २०२३-२४ या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. जागा मर्यादित असल्याने गरजूंनी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व मिरज वसतिगृहाचे अधीक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक कोर्स) यासाठी शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास तर मोटार ॲन्ड आर्मेचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स) व एम.एस.सी. आय. टी. (संगणक कोर्स) साठी किमान नववी पास आवश्यक आहे. वयोमर्यादा १६ ते ४० वर्ष असून प्रशिक्षण कालावधी १ वर्ष आहे. याठिकाणी फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
निवड झालेल्यांना प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय आहे. याठिकाणी अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा असून अनुभवी व तज्ञ निदेशकामार्फत प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी / व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेतंर्गत लाभ देण्यात येतो.
प्रवेशासाठी अर्ज अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळयाजवळ, मिरज, ता. मिरज जि. सांगली – ४१६४१० व फोन नंबर ०२३३-२२२२९०८ मोबाईल नंबर ९९२२५७७७५६१/ ९५९५६६७९३६ या पत्त्यावर पोस्टाव्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिका-यांचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीव्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त गरजू दिव्यांगानी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377