आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोरा येथे पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई !

VDO पाहण्यासाठी वरील लिंकला ओपन करा

पाचोरा– येथिल पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक अशोक पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात तैनात असलेले पोलिसांची टीम यांनी आज पाचोरा येथील शिवाजी महाराज चौक येथे नियमित वाहनांची व ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.पाचोरा शहरात वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसून अनेक वाहन चालक टू व्हीलर,फोर व्हीलर कमर्शियल वाहने व नियमबाह्य नंबर प्लेट लावणे श्रुतिकटु हॉर्न वाजवणे आदी बाबींमुळे शहरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत.अशातच दोन ट्राफिक पोलीस मागील काळात निलंबित झाल्याने वाहतुकीची व ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली होती तसेच पोलिसांचे नियमित कर्तव्य आणि नागरिकांना कायद्याचे महत्त्व कळले पाहिजे यासाठी पाचोरा पोलिसांनी मोहिम हाती घेतलेली दिसते.

अनेक वाहने हे नियमानुसार न ठेवता आपल्या वाहनांची मोडिफिकेशन करणे ,नंबर प्लेट चित्र विचित्र अक्षरे लावून तयार करणे तसेच ट्रिपल सीट बसणे ओव्हरलोड माल टू व्हीलर वर देखील वाहने अशा अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पाचोरा पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार यांनी प्रत्यक्ष हजर राहून कारवाई केली तसेच या पुढेही नागरिकांनी आपल्या वाहनांची तपासणी करणे त्याचे पीयूसी ,आपले ड्रायव्हिंग लायसन्स व नियमबाह्य लावलेले आपल्या गाडीवरील हॉर्न, बॉडी मॉडिफाइड करणे आदी बाबींमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा आपल्यावर पोलीस दलामार्फत कडक कारवाई करण्यात येईल असे सूतोवाच केले.

या कारवाईत पोलीस पोलीस कर्मचारी रणजीत पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील ,गजानन जोशी व दलातील अन्य सहकारी कर्मचारी यांनी मोहिमेत आपले कर्तव्य पार पाडले इतर सहकारी मित्रांनी देखील सदर बाबत पोलिसांना सहकार्य करताना दिसले ,तरी पुढील काळात नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे तसेच ट्रॅफिक जाम निर्माण होणार नाही याचे व आपल्या गाडीला कर्कश हॉर्न लावू नये जेणेकरून आपल्यावर परिवहन विभाग अथवा पोलीस विभाग यांच्यामार्फत कारवाई होणार नाही अन्यथा आपल्यावर आता ऑनलाइन पद्धतीने कारभार होत असल्याने चलन आपले नावावर पडेल व त्यासाठी आपणास कोर्टात अथवा आरटीओ ऑफिस अथवा पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर होऊन आपल्या गाडी क्रमांकावर असलेला फाईन भरावा लागेल तरी नागरिकांनी कायद्याचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे अशीच एक रास्त अपेक्षा नागरिकांकडून अपेक्षित असते.

पाचोरा पोलीस निरीक्षक यांनी सदर मोहीम आता प्रत्येक रहदारीच्या ठिकाणी व चौका चौकात राबवली जाणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल यात काही शंका नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी असे स्पष्ट संकेत दिले आहेत

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!