पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती पाचोरा भडगाव कार्यक्षेत्रात केळी कटती ३% वरून १.५% करण्याचा निर्णय सभापती गणेश भिमराव पाटील
पाचोरा- पाचोरा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या दि. २४/०७/२०२३ रोजी झालेल्या सभेत केळीवर आकारण्यात येणारी ३% सूट (कटती) शेतकऱ्यांकडून कापण्यात येत असे. त्यामुळे शेतकन्यांचे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी दि. २४/०७/२०२३ रोजी झालेल्या मासिक सभेत शेतकऱ्यांकडून कापल्या जाणाऱ्या ३% (सूट) कटती बाबत अभ्यास समिती गठीत करणेबाबत ठरविण्यात आले होते.
त्यानुसार बाजार समितीने सदर अभ्यास समितीमध्ये संचालकासह केळी व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी यांच्या समावेश केलेला होता. सदर बाबतीत दि.०८/०८/२०२३ रोजी बाजार समितीचे सभापती, उपसभापती, अभ्यास समिती सदस्य यांच्या समवेत बैठक झाली.
सदर बैठकीत केळीवर आकारण्यात येणारी ३% सूट (कटती) रद्द करून शेतकरी व व्यापारी हिताच्या दृष्टीने सदर कटती १.५% प्रमाणे कपात करण्यात यावी असे ठरले आहे. त्यानुसार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व खेडा खरेदी करणान्या केळी खरेदीदार व्यापान्यांना सूचित करण्यात येते की, सर्व व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे लायसन्स घेण्यात यावे.
विना परवाना केळी खरेदीदार व १.५% पेक्षा जास्त कटती घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती यांनी केले.
यावेळी सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, सचिव, केळी व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
” बाजार समितीने ३% केळी कटती वरून १.५% केळी कटती करण्याचा निर्णय घेतलेला असून व्यापारी जबरी पद्धतीने कटती करीत असल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तात्काळ तक्रार करावी. त्यावर बाजार समिती निश्चितपणे कायदेशीर कारवाई करेल” सभापती गणेश भिमराव पाटील,
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377