जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नागरिक, तृतीयपंथीयांशी संवाद !
जळगाव – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज स्वत : मतदार नोंदणीसह विविध विषयांवर जिल्ह्यातील नागरिकांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी यांनी स्वतः समस्या जाणून घेतल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भारत निवडणूक आयोगाद्वारे सुरु असलेल्या मतदार नोंदणी, मतदार पडताळणी मोहिमेमध्ये गृहभेटींअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हंबर्डी (ता.यावल) येथील मतदारांची गृहभेट घेतली. मतदार जागृती अभियान व निवडणूक प्रक्रियेविषयी सर्वसामान्य नागरिकांची थेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
भारत निवडणूक आयोगाद्वारे सुरु असलेल्या मतदार नोंदणी, मतदार पडताळणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर (सावदा) येथे तृतीयपंथी मतदारांची गृहभेट घेत संवाद साधला आणि समस्या जाणून घेतल्या.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377