गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा शाळेचा तालुकास्तरीय बॅडमिंटन व बुद्धिबळ स्पर्धेत दणदणीत विजय

पाचोरा- पाचोरा तालुक्यात सुरु असलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी एम.एम.कॉलेज या ठिकाणी क्रीडा व युवासेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित पाचोरा तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतलेला होता.त्यात 17 वर्ष आतील मुलांचा अंतिम सामना गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा विरुद्ध कै.पी.के.शिंदे स्कूल, पाचोरा यांच्यात रंगला. अटीतटीच्या सामन्यात गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ने अंतिम सामना जिंकून जिल्हास्तरावर पात्र ठरला आहे. विजयी संघात वैभव परदेशी, लोकेश पाटील व पृथ्वीराज परदेशी या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
तसेच दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी 14 वर्ष आतील व 22 ऑगस्ट 2023 रोजी 17 वर्षे आतील बुद्धिबळाचे सामने श्री गो.से हायस्कूल पाचोरा या ठिकाणी संपन्न झाले. त्यात 14 वर्षा आतील मुलींमध्ये श्रावणी अलाहित ही जिल्हास्तरासाठी पात्र ठरली आहे व 17 वर्षा आतील मुलींमध्ये आदिती अलाहीत हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला व हर्षिता कुकरेजा हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे .दोघेही जिल्हास्तरावर पात्र ठरल्या आहेत.विजयी खेळाडूंचे गुरुकुल शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनानी सर , पर्यवेक्षिका सौ. अमेना बोहरा व शाळेतील शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.अशा प्रकारे तीन ही क्रीडा स्पर्धेत ग्रुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवून जिल्हा पातळीवर प्रवेश केला.विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिलीप चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



