पाचोरा – महाराष्ट्र शासन व जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजीत १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गिरनाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलचा क्रिकेट संघ विजयी झाला. सदर स्पर्धा अनुभुती स्कूलच्या क्रिडांगणावर खेळविण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे संघ सहभागी झाले होते.
शिंदे इंटरनॅशनल स्कूल च्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे कौशल्य दाखवित सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळविला. या सामन्यांमध्ये तेजस पवार व धैर्यशिल पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
विजयी संघात तेजस पवार, धैर्यशील पाटील, ब्रिजेश पाटील, वेदांत महाले, दिपेश गवांदे, यश कोळी, यशदिप पगारे, सुजल पाटील, ओम साळुंखे, नैतिक चव्हाण, आयुष देशमुख, देवेश पाटील, हर्षीत कोटेचा यांचा समावेश होता.
गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासो पंडीतराव शिंदे, उपाध्यक्ष निरज मुणोत, सचिव ॲड. जे. डी. काटकर, सह सचिव प्रा. शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉ. विजय पाटील, क्रीडा शिक्षक सुशांत जाधव, जावेद शेख, सौ. मंगल गोडसे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377