श्री.गो.से.हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न पाचोरा( प्रतिनिधी)
पाचोरा – पा.ता.सह.शिक्षण संस्था, संचलित श्री.गो.से. हायस्कूल, पाचोरा या विद्यालयात लोकनेते,माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या स्मृती दिनानिमित्त गितगायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच शारदीय नवरात्रौत्सव निमित्त दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी कु. ऋतुजा बालपांडेची निवड झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ विद्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी नगरसेविका मा.ताईसाहेब सौ.सुचेताताई वाघ व तनिष्का ग्रुपच्या अध्यक्षा मा. ताईसाहेब सौ. ज्योतीताई वाघ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. रुपेश पाटील सर,श्री.सागर थोरात सर व श्रीमती.संगिता लासुरकर मॅडम यांनी ईशस्तवन सादर केले. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील सर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षिका सौ.ए.आर गोहील मॅडम,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर.बी.बोरसे सर व आभार प्रदर्शन श्री.रुपेश पाटील सर यांनी केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377