जिल्हा कारागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-किऑक्स मशीनचे लोकार्पण
जळगाव – जळगाव जिल्हा कारागृहात मानवी स्पर्शाद्वारे चालणाऱ्या ई-किऑक्स मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक ओ. आर वांदेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन विठ्ठल पाटील, तुरुंगाधिकारी एस.पी.कवार, आर.ओ. देवरे आदी उपस्थित होते. ई-प्रिसन्स् (e-prisons) च्या बंद्यांच्या सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत ई-किऑक्स (Biometric Touch Sereen e-Kiosk Machine) मशीन कारागृहास प्राप्त झाले आहे. या मशिनद्वारे कारागृहातील बंद्यांना प्रकरणाची स्थिती, कैदीच्या खात्यात शिल्लक खाजगी रोख शिल्लक, पुढील सुनावणीची तारीख, माफी, मजुरी सुविधा, पॅरोल / फर्लो अर्जाची स्थिती, प्रकाशन तारीख, उर्वरित फोन व मुलाखत संधी यांची माहिती घेता येईल.
छत्रपती संभाजीनगरच्या समता फौंडेशनच्या वतीने कैद्यांच्या मनोरंजनासाठी एलईडी टीव्हीचे २ संच भेट देण्यात आले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377