पाचोरा महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी कॅम्पचे आयोजन

पाचोरा दि. 06 – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर – 2023-24 खडकदेवळा खु.ll, ता. पाचोरा येथे संपन्न होत आहे. या शिबिराच्या पाचव्या दिवशी महाविद्यालयाच्या कार्यालयाकडून आज विशेष शिष्यवृत्ती कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना बारावी गुणपत्रक वितरण, बोनाफाईड प्रमाणपत्र वितरण, बस पासेस अर्ज वितरण, ओळखपत्र वितरण व मतदान नोंदणी कार्यक्रम अशा विविध सेवांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे वरिष्ठ लिपिक श्री. ऋषिकेश ठाकूर, श्री. संतोष महाजन, श्री. अभिषेक जाधव, श्री. रवींद्र चौधरी, श्री. नाना पाटील, श्री. सुधाकर पाटील व श्री. यश सूर्यवंशी यांनी आयोजन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. राजेश वळवी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले उपस्थित होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक-स्वयंसेविकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



