पाचोरा – नुकत्याच साकुर फाटा इगतपुरी जिल्हा नाशिक येथे मा.उत्तमराव दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बारावी उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली त्यात पाचोरा येथील महावीर व्यायाम शाळा महिला मल्ल कु, अक्षरा बागुल, कु आरुषी पाटील यांना येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धेमध्ये चांगले यश प्राप्त झाले आहे.पाचोरा येथील महावीर व्यायाम शाळेतील महिला मल्लांनी उत्तर महाराष्ट्रीय खुल्या केसरी गटात भाग घेऊन कु.अक्षरा बागुल द्वितीय क्रमांक मिळवत उपकेसरी पदाचा बहुमान पटकावला तर कु.आरुषी पाटीलला 35 किलो वजन गटात दुसरा क्रमांक मिळाला असून याने पाचोरा येथील महावीर व्यायाम शाळेचा नावलौकिक यावेळेस सर्वत्र बघावयास मिळत आहे
राम मंदिर परिसरात सुरू असलेल्या महावीर शाळेतील पुरुष व महिला मल्ल हे महाराष्ट्र स्तरावर आपली चुनुक दाखवत असून विविध प्रकारचे बक्षिसे ,पुरस्कार ते प्राप्त करत असतात यामुळे पाचोरा तालुक्याचे नाव आज सबंध महाराष्ट्रामध्ये नावलौकिकास येत आहे राम मंदिरातील कुस्तीच्या या हौदास जुनी परंपरा असून येथील मल्लांनी एकेकाळ महाराष्ट्रात आपले स्थान निर्माण केलेले होते आजही त्या परंपरेवर वाटचाल करीत येथील मल्ल उत्स्फूर्तपणे विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन किताब पटकवितांना दिसत आहे.
हे सर्व होत असताना शिष्यांना गुरूंची ही परंपरा लाभलेले असतेच येथील पैलवान दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज मल्ल प्रॅक्टिस करताना पाहावयास मिळतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील बापू पैलवान लखन पैलवान ,निलेश कुलकर्णी सर हे त्यांच्या मदतीस असतात या संस्थेचे अध्यक्ष राजीव दादा पाटील ,कैलास आमले सर , गजेंद्र जोशी , सुनील पाटील सर , पै.तात्या नागणे व इतर वरिष्ठ माजी पैलवान हे नित्याने येथे येऊन मोलाचे मार्गदर्शन तर करताच परंतु कुस्ती या खेळास व खेळाडूस सहकार्य ही प्राप्त करून देत असतात. शिवाय राम मंदिर परिसरातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक व दानशूर व्यक्तिमत्व येथे विविध स्पर्धेसाठी. व कुस्ती खेळास प्रोत्साहन मिळण्यासाठी आपले योगदानही देताना दिसत असतात.
यामुळे पाचोरा शहराचे नावलौकिक कुस्ती खेळामध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.