अरुणा उदावंत व चंद्रकांत पाटील यांना क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार
पाचोरा – तालुक्यातील राजुरी बुद्रुक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा उदावंत व खडकदेवळा हायस्कूलचे उपशिक्षक चंद्रकांत पाटील यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा “क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची “नाशिक विभागीय शिक्षण परिषद” नुकतीच धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात संपन्न झाली. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. धरतीताई देवरे, नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित दादा तांबे, नाशिक येथील पोलीस अकादमीचे पोलीस उपाधीक्षक एल. एन. कानडे, सहकार भारतीचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दिलीप दादा पाटील, धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजाताई खडसे, महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष गजेंद्र कानडे, नाशिक विभागीय अध्यक्ष पंकज शिंदे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे सहसचिव म्हणून चंद्रकांत पाटील व महिला संघटक म्हणून अरुणा उदावंत यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संघटनेतर्फे मान्यवरांच्या हस्ते दोन्ही गुणवंत शिक्षकांना क्रियाशील कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. याबद्दल शिक्षण क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377